KCR : हैदराबाद : तेलंगाणामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे त्यामुळे अनेक भागात पूर आला आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले आहे. पूरग्रस्ता भागाचीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री राव यांनी एक अजब विधान केले आहे. तेलंगाणात झालेल्या पावसामागे विदेशी हात आहे, कुणीतरी बदला घेत असल्याचे राव म्हणाले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त होत आहे.
CM Sri KCR has undertaken the aerial survey of areas affected by #GodavariFloods from Bhadrachalam to Eturunagaram. Hon'ble CM has examined the Godavari River in spate and the villages inundated by the floods in one of the worst natural disasters #Telangana has seen. pic.twitter.com/5QwlLuV5VW — Telangana CMO (@TelanganaCMO) July 17, 2022
मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, ढगफुटीसारखी नवीन गोष्ट समोर आली आहे. मला माहित नाही हे कितपत योग्य आहे परंतु या ढगफुटीमध्ये विदेशी हात आहे, कुणीतरी बदला घेत आहेत असे केसीआर म्हणाले. तसेच यापूर्वी लडाख जवळी लेह मध्ये त्यानंतर उत्तराखंड आणि आता गोदावरी भागात ढगफुटी झाली आहे. काहीही असो वातावरण बदलामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी आपल्या लोकांची काळजी घेणे गरजेचे आहे असेही केसीआर म्हणाले.
Telangana CM KCR said, "there may be a conspiracy by other countries behind cloudbursts in some parts of our country, we don't know how much truth there is to it. It was earlier done in Leh, then Uttarakhand & now reports are from near Godavari (in Andhra Pradesh)." pic.twitter.com/dGfHlPYA6T — ANI (@ANI) July 17, 2022
तेलंगाणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करून माहिती दिली आहे की मुख्यमंत्री केसीआर यांनी भद्राचलम यांनी एटुरुनगरम पर्यंत पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. केसीआर यांनी गोदावी नदीचाही दौरा केला तसेच पूरग्रस्त गावांचाही दौरा केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री केसीआर यांनी गोदावरी नदीची पुजाही केली आहे.
तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की पुराचा सर्वाधिक फटका भद्रचलम, बरगमपाडू आणि पिनापक्का भागाला पुराचा सर्वाधिक फटका ब्सला आहे. असे असले तरी या भागात कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. पुरग्रस्त भागातील रहिवाशांसाठी उंच भागावर रहिवासी निवास बांधण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. तसेच पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबांना १० हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.
या शिवाय २ महिन्यांपर्यंत प्रत्येक कुटुंबाला २० किलो तांदूळ आणि इतर मदत करण्याचेही जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री केसीआर यांनी जिथे जिथे शेतीचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून मदत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी गोदावरी नदीचा स्तर ७१.३० फुटावर गेल आअहे. भद्राचलममध्ये गोदावरी नदीची धोक्याची पातळी ५३ फुटांवर आहे. भद्राद्री-कोठागुडेम जिल्ह्यातील २६ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.