Eknath Shinde in Ayodhya : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व कॅबिनेट मंत्री शनिवारी उशिरा लखनऊला पोहोचले. यावेळी 'जय श्री राम'च्या जयघोषात त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. आज सकाळी ते अयोध्येला पोहोचून राम मंदिराचे दर्शन घेणार आहेत.
अधिक वाचा : MBA CET : एमबीए सीईटी 27 एप्रिलला होणार
एकनाथ शिंदे मंत्र्यांसह शनिवारी लखनौमध्ये रात्रीचा मुक्काम केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलना त्यांनी बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्वावर भाष्य केले. याशिवाय उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. याशिवाय वीर सावरकरांविरोधात वक्तव्य केल्याबद्दलही त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
अधिक वाचा : मुंबईच्या समुद्रात खोदणार बोगदा… जाणून घ्या कधी धावणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन
हिंडेनबर्ग-अदानी प्रकरणातील काँग्रेसच्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विधान समोर आल्यानंतर, लोकसभा निवडणुकीपूर्वी ते एनडीएमध्ये सामील होतील, अशी अटकळ बांधली जात आहे. या प्रश्नावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे हेलिकॅप्टरने अयोध्येला पोहोचणार आहे. त्यानंतर ते हनुमानगढी मंदिर आणि राम मंदिरात प्रार्थना करणार आहेत. तेथे सुरू असलेले बांधकामही ते पाहणार आहे. रामजन्मभूमी मंदिरात आणि शरयू नदीच्या काठावर संध्याकाळची आरती करणार. ते अयोध्येतील साधूंनाही भेटणार आहेत. रविवारी रात्री उशिरा ते अयोध्येहून मुंबईला परतणार आहेत. शिंदे सुमारे नऊ तास अयोध्या परिसरात घालवतील.
अधिक वाचा : बीडच्या बाजार समितीच्या निवडणुकीवरून क्षीरसागर काका-पुतणे आमने-सामने
शिवसेनेच्या या अयोध्या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून या दोन गाड्यांमधून एकूण 3,000 हून अधिक शिवसैनिक शुक्रवारी अयोध्देला रवाना झाली. शिंदे यांनी ठाण्यात 'जय श्री राम'च्या जयघोषात शिवसैनिकांना मंदिरात घेऊन जाणार्या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. स्पेशल ट्रेन समोर 'चलो अयोध्या' बोर्डाने सुंदर सजवण्यात आली होती. शिवसैनिकांना घेऊन जाणारी दुसरी ट्रेन नाशिकहून अयोध्येकडे रवाना झाली.
सकाळी १०.४५ वाजता रामसेतू पार्कवर हेलिकॅप्टरने आगमन होणार
सकाळी ११ वाजता रामसेतू पार्क ते राम मंदिर पायी रॅली
सकाळी १२ वाजता श्रीराम मंदिर दर्शन, मंदिर निर्माण पाहणी
दुपारी २ वाजता हनुमान गडी दर्शन
दुपारी २.३० वाजता पत्रकार परिषद हाॅटेल पंचशील
दुपारी ३.३० वाजता लक्ष्मण किल्ला येथे संत-महंत आर्शिवाद सोहळा
सायंकाळी ६ वाजता शरयू नदीच्या घाटावर आरती
.