CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट, २० मिनिटे चर्चा

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शिवसेनेच्या राज्य प्रमुखांची भेट घेतली, त्यानंतर शिंदे मुंबईसाठी रवाना होणार होते. शिंदे यांच्या कार्यक्रमात अचानक बदल झाला आणि ते दिल्लीतच थांबले. रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास शिंदे आणि शहा यांची भेट झाली. दोघांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली.

amit shaha and eknath shinde
अमित शहा आणि एकनाथ शिंदे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शिवसेनेच्या राज्य प्रमुखांची भेट घेतली,
  • त्यानंतर शिंदे मुंबईसाठी रवाना होणार होते.
  • शिंदे यांच्या कार्यक्रमात अचानक बदल झाला आणि ते दिल्लीतच थांबले. रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास शिंदे आणि शहा यांची भेट झाली. दोघांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली.

CM Eknath Shinde : नवी दिल्ली : काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शिवसेनेच्या राज्य प्रमुखांची भेट घेतली, त्यानंतर शिंदे मुंबईसाठी रवाना होणार होते. शिंदे यांच्या कार्यक्रमात अचानक बदल झाला आणि ते दिल्लीतच थांबले. रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास शिंदे आणि शहा यांची भेट झाली. दोघांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली. शिवसेनेच्या धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर निवडणूक आयोगाने दिलेली मुदत लवकरच संपत आहे., २७ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची बैठक महत्त्वाची ठरली आहे. (cm eknath shinde meet union minister amit shah in delhi over bmc election)

अधिक वाचा : Ajit Pawar: फिफाच्या कार्यक्रमाला अजितदादांनी वैतागून मारली 'किक', नेमकं घडलं तरी काय? वाचा

काल गुरूवारी मुंबईत शिवसेनेचा गोरेगावमध्ये पदाधिकार्‍यांचा मेळावा पार पाडला. तर दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशातील शिवसेनेच्या राज्यप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईसाठी रवान होणार होते. परंतु रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ते महाराष्ट्र सदनमधून बाहेर पडले आणि त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजही दिल्लीत आहेत. शिंदे आज अनेक नेत्यांच्या भेटी घेतील असे सांगण्यात येत आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनेमध्ये संघर्ष सुरू आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना आपले लेखी निवेदन देण्याचे निर्देश दिले होते. याची मुदत लवकरच संपणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा : Shiv Sena Melava: मुंबई संकटात असताना ही गिधाडं कुठे असतात, उद्धव ठाकरेंचा शहांना सवाल


अमित शहा मुंबई दौर्‍यावर

काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी मुंबईचा दौरा केला होता. शहा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. तसेच या दौर्‍यात भाजप पदाधिकार्‍यांची भेटही घेतली होती. भाजपने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. 

अधिक वाचा :  Mumbai Auto - Taxi strike: मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, 'या' तारखेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांचा संप

पंतप्रधान मोदी प्रचारासाठी

शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची झाली असून पालिका निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत अमित शहा आणि नरेंद्र मोदी उतरले होते. महानगरपालिका निवडणूक तेलंगाणा राष्ट्र समितीने जिंकली होती, परंतु भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली होती. 

अधिक वाचा : Mumbai Accident: घाटकोपरमध्ये भीषण अपघात; ओला गाडीची 8 जणांना धडक, LIVE VIDEO आला समोर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी