CM एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदी-शहांशी करणार चर्चा; फडणवीसांसाठी धोक्याची घंटा?

Maharashtra news: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याआधी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यासाठी ते दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

cm eknath shinde to visit delhi discuss cabinet expansion with modi shah alarm bell for devendra fadnavis
'ही' देवेंद्र फडणवीसांसाठी धोक्याची घंटा?  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा पहिल्यांदाच दिल्ली दौरा
  • उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसही असणार सोबत
  • दिल्ली दरबारी शिंदेंचं वजन वाढलं, देवेंद्र फडणवीसांसाठी धोक्याची घंटा?

Maharashtra Politics: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) शुक्रवारी प्रथमच दिल्लीत येत आहेत. त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे. या दौऱ्यात एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह भाजपच्या (BJP) प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. याच भेटीमध्ये मंत्रिमंडळ (Cabinet) विस्ताराबाबत चर्चा होणार आहे. मात्र या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दिल्ली दरबारी एकनाथ शिंदे यांचं वजन प्रचंड वाढलं आहे. हा भाजपमधील राज्य पातळीवरील सर्वच नेत्यांना एक प्रकारे इशारा असल्याचं बोललं जात आहे. 

एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या एका विशिष्ट गटाचं नेतृत्व करत असले तरीही सर्व महत्त्वाच्या निर्णयासाठी त्यांना मोदी-शाह यांच्यावरच अवलंबून राहावं लागणार असल्याचं या निमित्ताने अधोरेखित झालं आहे. याआधी राज्यातील भाजपमधील जवळजवळ सगळे निर्णय हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सुचनेनुसारच घेतले जायचे. मात्र, आता मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांना बसविण्यात आल्याने तेच मोदी आणि शाह यांच्यासोबत संपूर्ण चर्चा करतील. खरं म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणार आहेत. मात्र, प्रामुख्याने चर्चा ही शिंदेसोबतच होईल. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाचं सध्याचं राजकारण ही देवेंद्र फडणवीसांसाठी धोक्याची घंटा तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिंदे यांचा दिल्ली दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा शिवसेनेचे अनेक नेते शिंदे गटात सामील होत आहेत. गुरुवारी ठाण्यातील शिंदे गटात उद्धव गटाचे ६५ माजी नगरसेवक सामील झाले. तर आज कल्याण-डोंबिमधील ४० माजी नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. येत्या काही दिवसात शिवसेनेचे सुमारे 10 ते 12 खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याचीही चर्चा आहे.

अधिक वाचा:  Gulabrao Patil: 'लोकं सरपंच पदाची खुर्ची सोडत नाही आम्ही तर मंत्रिपदं सोडली', गुलाबराव आले फॉर्मात

दिल्ली दौऱ्यात फडणवीसही असणार सोबत

भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसही असतील. शिंदे पुढील दोन दिवस दिल्लीत राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही नेते पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शनिवारी हे दोन्ही नेते पुण्याहून दिल्लीला रवाना होतील. रविवारी पंढरपुरात आषाढी एकादशीची महापूजा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

अधिक वाचा: तर मातोश्रीवर परत जाऊ, बंडखोर राठोड यवतमाळमध्ये पोहचल्यावर खळबळ विधान

लवकरच नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार 

नवीन सरकारमध्ये मंत्री आणि त्यांची खाती कोणती असतील याबाबत मोदी-शाह यांची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा होणार आहे.  शिंदे सरकारमध्ये एकूण ५४ मंत्री असू शकतात. यामध्ये भाजपच्या कोट्यातील २५ आणि शिंदे गटातील १३ आमदारांना मंत्री केले जाऊ शकते. 

यानंतर उर्वरित जागांवर अपक्ष आमदारांना मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. राजकीय दृष्टिकोनातून येणारे दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. विशेषत: उद्धव ठाकरेंना आपल्या नेत्यांना एकसंध ठेवणं फारच आव्हानात्मक असणार आहे.

अधिक वाचा: Shiv Sena: 'या' व्यक्तीमुळेच शिवसेना फुटली', बंडखोर आमदार शंभूराज देसाईंचा सरळसरळ आरोप

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दिल्लीत बोलावलं

महाराष्ट्राच्या राजकीय संकटात काँग्रेस आमदारांच्या भूमिकेवर पक्ष हायकमांड खूश नाही. यामुळेच महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत पाचारण करण्यात आलं आहे. पटोले महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची माहिती पक्षश्रेष्ठींना देणार आहेत. 

महाविकास आघाडी युती राहणार की नाही यावरही चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीत फुटलेली मतं आणि बहुमत चाचणीनंतर आमदारांच्या भूमिका याबाबत देखील चर्चा होऊ शकते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी