CM शिंदेंचा दावा ठरला खोटा, राष्ट्रपती निवडणुकीत नाही झाली मोठी बंडखोरी

presidential election : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून २०० आमदारांची मते मिळतील असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. पण निवडणुकीत मुर्मू यांना महाराष्ट्रातून १८१ आमदारांचीच मते मिळाली. एकनाथ शिंदे यांचा दावा खोटा ठरला.

CM Shinde's claim turned out to be false, MLAs did not split in the presidential election  CM
CM शिंदेंचा दावा ठरला खोटा, राष्ट्रपती निवडणुकीत नाही झाली मोठी बंडखोरी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • CM शिंदेंचा दावा ठरला खोटा
  • राष्ट्रपती निवडणुकीत नाही झाली मोठी बंडखोरी
  • महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू यांना १८१ मते मिळाली, मुख्यमंत्र्यांचा २०० मते मिळतील हा दावा खोटा ठरला

CM Shinde's claim turned out to be false, MLAs did not split in the presidential election : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून २०० आमदारांची मते मिळतील असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. पण निवडणुकीत मुर्मू यांना महाराष्ट्रातून १८१ आमदारांचीच मते मिळाली. एकनाथ शिंदे यांचा दावा खोटा ठरला. मतदानावेळी राज्यात मोठी बंडखोरी झाली नाही असे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला त्यावेळी त्यांना १६४ मते मिळाली होती. हे १६४ आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मत देणार हे उघड होते. नंतर खासदारांच्या दबावापोटी उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. ही घोषणा झाली त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे १६ आमदार होते जे आजही आहेत. या १६ आमदारांमुळे मुर्मू यांना राज्यातून १८० मते मिळणार हे स्पष्ट झाले होते. विधानसभाध्यक्षांचे आमदार म्हणून असलेले मत विचारात घेतले तर १८१ हेच उत्तर येते. महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू यांना १८१ मते मिळाली. यामुळेच मुख्यमंत्र्यांचा २०० मते मिळतील हा दावा खोटा ठरला असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून २०० मते मिळतील अस दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. हा दावा त्यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता. यामुळे राज्यातील ज्या आमदारांनी राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत असूनही बंडखोरी केली होती ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आता मुर्मू यांना मत देतील असा अंदाज होता. पण तसे झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले नाही.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना ६ लाख ७६ हजार ८०३ मतमूल्य मिळाले. मुर्मू यांचे प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांना ३ लाख ८० हजार १७७ मतमूल्य मिळाले. यशवंत सिन्हा २ लाख ९६ हजार ६२६ मतमूल्याने पराभूत झाले. चार फेऱ्यांची मतमोजणी झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांना एकूण मतांपैकी ६४.०३ टक्के मिळाली, असे निवडणूक अधिकारी पी. सी. मोदी यांनी जाहीर केले. यशवंत सिन्हा यांना ३६ टक्के मते मिळाली. 

द्रौपदी मुर्मू यांना ५४० खासदारांसह २८२४ मते मिळाली. यशवंत सिन्हा यांना २०८ खासदारांसह १८७७ मते मिळाली. यानंतर निवडणूक अधिकारी पी. सी. मोदी यांनी द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याचे जाहीर केले. विजयासाठी आवश्यक कोट्यापेक्षा जास्त मते मिळवत मुर्मू यांनी निवडणूक जिंकली.

निवडणुकीत ५३ मते अपात्र ठरविण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १७ खासदारांनी क्रॉसव्होटिंग करून यशवंत सिन्हा यांच्याऐवजी मुर्मू यांना मतदान केले. द्रौपदी मुर्मू यांना प्रत्येक राज्यातून मते मिळाली. याउलट यशवंत सिन्हा यांना आंध्रप्रदेश, नागालँड, सिक्कीम या तीन राज्यांतून एकही मत मिळाले नाही. 

निकाल जाहीर झाल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी पराभव स्वीकारत द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले. भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संविधान संरक्षकाची भूमिका चोख बजावतील असा विश्वास सिन्हा यांनी व्यक्त केला. 

पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले. पहिल्यांदाच वनवासी समाजाचा प्रतिनिधी देशातील सर्वोच्च पदाची निवडणूक जिंकला आहे. ही निवडणूक जिंकून मुर्मू यांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांनीही राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकलेल्या द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले. मुर्मू यांच्या विजयामुळे भारतीय लोकशाही मजबूत असल्याचा आणखी एक संकेत मिळाल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी