Varanasi मोदींच्या प्रयत्नाने कॅनडातून आलेल्या अन्नपूर्णा देवीची CM योगी करणार प्राणप्रतिष्ठा

CM Yogi Adityanath will worship Ma annapurna statue in Varanasi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे कॅनडातून भारतात परत आलेल्या माता अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वाराणसी येथे प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

CM Yogi Adityanath will worship Ma annapurna statue in Varanasi
Varanasi मोदींच्या प्रयत्नाने कॅनडातून आलेल्या अन्नपूर्णा देवीची CM योगी करणार प्राणप्रतिष्ठा 
थोडं पण कामाचं
  • Varanasi मोदींच्या प्रयत्नाने कॅनडातून आलेल्या अन्नपूर्णा देवीची CM योगी करणार प्राणप्रतिष्ठा
  • कार्यक्रम सोमवार १५ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार
  • गुरुवार ११ नोव्हेंबर २०२१ रोजी दिल्लीतून अन्नपूर्णा देवीची मूर्ती वाराणसीला रवाना होईल

CM Yogi Adityanath will worship Ma annapurna statue in Varanasi । वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे कॅनडातून भारतात परत आलेल्या माता अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वाराणसी येथे प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. हा कार्यक्रम सोमवार १५ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. याआधी गुरुवार ११ नोव्हेंबर २०२१ रोजी दिल्लीतून अन्नपूर्णा देवीची मूर्ती वाराणसीला रवाना होईल. मूर्ती रस्ते मार्गाने उत्तरेतील निवडक जिल्ह्यांमध्ये विसावा घेत प्राणप्रतिष्ठेसाठी वाराणसीत दाखल होईल. ही मूर्ती कॅनडा सरकारने भारत सरकारच्या ताब्यात दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची काशी (वाराणसी) विश्वनाथ धाम येथील प्रांगणात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या संदर्भात लवकरच उत्तर प्रदेश सरकार अधिकृत माहिती प्रसिद्ध करणार आहे. 

भगवान शंकर यांचे नगर असलेल्या काशीला अन्न क्षेत्र असेही म्हणतात. शंकर देवाने काशी येथे अन्नपूर्णा देवीकडे भिक्षा मागितली होती. यामुळेच काशीत अन्नपूर्णा देवीचे विशेष महात्म्य आहे. ही मूर्ती अनेक शेकडो वर्षांपूर्वी काशीतून गायब झाली. पुढे ही मूर्ती कॅनडात पोहोचली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने ही मूर्ती कॅनडा सरकारकडून भारत सरकारला मिळाली. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वाराणसी येथे या माता अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. 

दिल्लीतून रस्ते मार्गाने माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती मिरवणुकीतून उत्तर प्रदेशसाठी रवाना होईल. मूर्तीची मिरवणूक ११ नोव्हेंबर रोजी दिल्लीतून सुरू होईल. ही मूर्ती १२ नोव्हेंबर रोजी सोरा, खासगंज नंतर १३ नोव्हेंबर रोजी कानपूर, १४ नोव्हेंबर रोजी कानपूर आणि १५ नोव्हेंबर रोजी वाराणसी येथे असेल. 

पंचागकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार १५ नोव्हेंबर २०२१ रोजी भागवत एकादशी आहे. याच दिवशी तुळशी विवाहारंभ आहे. कार्तिक महिन्यातील पंढरपूरच्या यात्रेला याच दिवशी सुरुनात होईल. तसेच या दिवशी चातुर्मास्य समाप्ती, महालय समाप्ती आहे. यामुळेच या पवित्र दिवशी माता अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी