Cold Tea Serve to CM : मुख्यमंत्र्यांना दिला थंड चहा, प्रशासकीय अधिकार्‍याला कारणे दाखवा नोटीस

मुख्यमंत्र्यांचा जिल्हा दौरा असेल तर त्या जिल्ह्याच्या प्रशासनाकडे मुख्यमंत्र्यांची बडदास्त ठेवण्याची जबाबदारी असते. हा दौरा व्यवस्थित होण्याची पूर्ण काळजी जिल्हा प्रशासनाला घ्यायची असते. फक्त सुरक्षाच नव्हे तर मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असलेल्या अधिकार्‍यांचा पाहुणचारही जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागतो. परंतु एका जिल्हा दौर्‍यात मुख्यमंत्र्यांना थंड चहा दिला म्हणून एका अधिकार्‍याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

cold tea served
थंड चहा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्र्यांचा जिल्हा दौरा असेल तर त्या जिल्ह्याच्या प्रशासनाकडे मुख्यमंत्र्यांची बडदास्त ठेवण्याची जबाबदारी असते.
  • जिल्हा दौर्‍यात मुख्यमंत्र्यांना थंड चहा दिला म्हणून एका अधिकार्‍याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
  • तसेच तीन दिवसांच्या अवधीत या अधिकर्‍याला उत्तर देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

CM Cold Tea : भोपाळ : मुख्यमंत्र्यांचा जिल्हा दौरा असेल तर त्या जिल्ह्याच्या प्रशासनाकडे मुख्यमंत्र्यांची बडदास्त ठेवण्याची जबाबदारी असते. हा दौरा व्यवस्थित होण्याची पूर्ण काळजी जिल्हा प्रशासनाला घ्यायची असते. फक्त सुरक्षाच नव्हे तर मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असलेल्या अधिकार्‍यांचा पाहुणचारही जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागतो. परंतु एका जिल्हा दौर्‍यात मुख्यमंत्र्यांना थंड चहा दिला म्हणून एका अधिकार्‍याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच तीन दिवसांच्या अवधीत या अधिकर्‍याला उत्तर देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

ही घटना मध्य प्रदेशमधील आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान छतरपूर जिल्हाच्या खजुराहो दौर्‍यावर होते. तेव्हा त्यांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना थंड चहा देण्यात आला. तेव्हा या प्रकरणी कनिष्ठ नागरी पुरवठा अधिकार्‍याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.  

हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार छतरपूर, राजनगर, अनुमंडल दंडाधिकी डीपी द्विवेदी यांनी राकेश कन्नौहा यांना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना थंड वाईट दर्जाचा चहा दिला. थंड चहा देणे आणि प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी कन्नौहा यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

नोटिशीनुसार मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारासाठी खजुराहो विमानतळावर आले होते. तेव्हा विमानतळाच्या व्हीआयपी कक्षात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या पाहुण्यांना चहा नाष्टा देण्यात आला होता. परंतु हा चहा थंड होता आणि वाईट दर्जाचा होता. नोटिशीत म्हटले आहे की सोमवारी खजुराहो विमानतळावर जेव्हा मुख्यमंत्री आले तेव्हा चहा आणि नाष्टा देण्याची जबाबदारी प्रभारी जेसओकडे होती. दिलेला चहा थंड आणि वाईट दर्जाचा असल्याने जिल्हा प्रशानासाथी ही लाजिरवाणी बाब आहे असे नोटिशीत म्हटले आहे.  

तसेच व्हीआयपी ड्युटीच्या वेळी प्रोटोकॉलचे उल्लंघन करण्यात आले आहे. या प्रकरणी कनिष्ठ नागरी पुरवठा अधिकार्‍याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे तसेच तीन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहे. असे न केल्यास कारवाई केली जाईल असेही नोटीशीत म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी