थंड बिअर पिणाऱ्यांनो, तुमच्यासाठी दुःखद बातमी

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 26, 2019 | 17:57 IST | टाइम्स नाऊ हिंदी

मेक्सिकोमध्ये दुकानांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी बिअर पिण्यावरून उचल-सुलट चर्चा सुरू असतात. आता हा खप कमी करण्यासाठी एका महिला खासदाराने अजब प्रस्ताव सादर केला आहे. त्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.

Beer sale in Mexico
मेक्सिकोमध्ये बिअर विक्री संदर्भात अजब प्रस्ताव  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मेक्सिकोमध्ये बिअर संदर्भात अजब प्रस्ताव
  • तरुणांच्या बिअर पिण्यावरून चिंता
  • मेक्सिको सिटी संदर्भातील आकडेवारीनंतर आला प्रस्ताव

नवी दिल्ली: तुम्हाला जर थंड बिअर प्यायची हौस असेल तर, तुम्हाला तुमच्या मनाला थोडी मुरड घालावी लागणार आहे. होय. बातमीच तशी आहे. तुम्हाला बिअर थंडच हवी असेल तर, ती तुम्हाला घरी घेऊन जावी लागणार आहे. घरी घेऊन गेल्यानंतर तुमच्या फ्रीजमध्ये ती थंड करून ती घरातच प्यावी लागणार आहे. थोडी धक्कादायक आहे. पण, अशा पद्धतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. बिअर शौकिनांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, हा प्रस्ताव आपल्या देशातील नसून, मेक्सिकोमधील आहे.

काय आहे प्रस्ताव?

मेक्सिको सिटी या राजधानीच्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. दारू अर्थात बिअर हे त्यामागील एक कारण असल्याचा युक्तीवाद तेथील एका स्थानिक काँग्रेसच्या सभागृह सदस्यांनी केला आहे. त्याला आळा घालण्यासाठी हा विशेष प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. मेक्सिकोमध्ये राष्ट्रपती एंड्रेस मैनुअल लोपेज ओब्राडोर यांचे डाव्या विचारांचे सरकार आहे. त्यांच्या मोरेना पक्षाच्या सदस्या मारिया डी लुर्डेस पाज यांनी बिअर विक्री संदर्भात एक प्रस्ताव सादर केला आहे. त्या प्रस्तावात मारिया यांनी म्हटले आहे की, जर बिअर विक्रीच्या ठिकाणी थंड न करता ठेवली तर, खरेदी करणाऱ्यांना बिअर घरीच घेऊन जावी लागले. बिअर घरी घेऊन गेल्यानंतर ती थंड करून घरी बसूनच प्यावी लागेल. त्यामुळे बाहेर बिअर पिणाऱ्यांची संख्या आपसूकच घटेल.

युवकांचे प्रमाण जास्त

या संदर्भात मांडण्यात आलेल्या विधेयकात मेक्सिकोमध्ये अनेकांना दारूचे व्यसन लागल्याच्या वृत्ताचा हवाला देण्यात आला आहे. मेक्सिको सिटी शहराचा विचार केला तर, शहरात युवकांकडून दारूची खरेदी होण्याचे प्रमाण जास्त आहे. याबाबतची आकडेवारी समोर आल्यामुळेच मारिया यांनी हा प्रस्ताव दिला आहे. विशेष म्हणजे मारिया काँग्रेसच्या सभागृह सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रस्तावाला महत्त्व देखील आहे. बिअर पिणारे तरुण मित्रांसोबत जातात बिअर खरेदी करतात आणि छोट्या छोट्या दुकानांमध्ये बिअरचा आनंद घेताना दिसतात. त्यामुळेच मारिया यांनी अल्कोहोल असलेली सगळी पेये बाहेरच्या तापमानात ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. अर्थात या प्रस्तावाची स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या सभागृहात यावर चर्चा होणार का? याविषयी अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाहीये. पण, सोशल मीडियावर मात्र, या प्रस्तावावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी