Maharashtra Politics: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस, बहुमत सिद्ध करण्याचे आदेश

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतून बंडखोरी करणार्‍या शिंदे गटाला नोटीस पाठवली आहे. दोघांनाही बहुमत सिद्ध करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला बहुमत सिद्ध करण्यासाठी संबंधित पुरावे मागितले असून या प्रकरणी आता ८ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला आहे, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याला आव्हान दिले आहे.

ठाकरे वि. शिंदे
uddhav vs shinde  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतून बंडखोरी करणार्‍या शिंदे गटाला नोटीस पाठवली आहे.
  • दोघांनाही बहुमत सिद्ध करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे.
  • या प्रकरणी आता ८ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

Maharashtra Political Crisis : नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (Election Commission of india) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) आणि शिवसेनेतून बंडखोरी करणार्‍या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला नोटीस पाठवली आहे. दोघांनाही बहुमत (Majority) सिद्ध करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला बहुमत सिद्ध करण्यासाठी संबंधित पुरावे मागितले असून या प्रकरणी आता ८ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला आहे, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याला आव्हान दिले आहे. 

अधिक वाचा :  Harish Salve Argument: 'ज्यांना 20 आमदारांचा पाठिंबा नाही त्यांना सीएम करणार?', पाहा हरीश साळवेंचा सुप्रीम कोर्टातील युक्तिवाद

यापूर्वी एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्य बाण आपल्यला मिळाव अशी मागणी केली होती. शिंदे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात ५५ पैकी ४० आमदार तसेच १९ खासदारांपैकी १२ खासदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. निवडणूक आयोगला पाठवलेल्या पत्रात शिंदे गटाने आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला होता. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिल्याचेही शिंदे गटाने आपल्या पत्रात नमूद केले आहे. 

अधिक वाचा : Shinde Vs Shiv Sena: शिवसेनेची बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद, सिंघवींनी केली 'ही' मोठी मागणी

बंडखोरी करून पाडले ठाकरे सरकार

राज्यात शिवसेनेच्या ५० पैकी ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 

अधिक वाचा : Ramdas Kadam: रामदास कदम का रडले एवढे ढसाढसा?

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही निवडणूक आयोगाला पत्र 

लोकसभेत शिंदे गटाच्या नेतेपदी राहुल शेवाळे तर प्रतोदपदी भावना गवळी यांची नियुक्ती करण्यात आली होती. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी शेवाळे यांना शिवसेना नेतेपदासाठी मान्यताही दिली. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घ्यावी असे आवाहन या पत्रातून करण्यात आले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी