कोरोना लसीवरून कंपन्या-सरकारमध्ये तू-तू मैं-मैं, पूनावाला यांनी युकेमध्ये सुरू केला लसीचा बिझनेस

लोकल ते ग्लोबल
Updated May 04, 2021 | 19:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

नुकतेच सिरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांनी म्हटले होते की जानेवारीमध्ये जेव्हा केसेस कमी झाल्या तेव्हा सरकारने कोरोनाकडे दुर्लक्ष केले आणि लसीसाठी ऑर्डर मिळण्यास बंद झाल्या. 

adar poonawala
कोरोना लसीवरून कंपन्या-सरकारमध्ये तू-तू मैं-मैं 

थोडं पण कामाचं

  • अदार पूनावालाने म्हटले होते की जेव्हा केसेसे कमी होऊ लागल्या तेव्हा सरकारने कोरोनाकडे दुर्लक्ष केले
  • सरकारचे विधान आले की लसीसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. मात्र कंपन्या लसीचा पुरवठा करू शकत नाहीयेत.
  • सरकारच्या माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यातील ऑर्डरही पूर्ण झालेली नाही

मुंबई: मे महिन्याच्या एक तारखेपासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना(corona) लसीकरणाला(vaccine) सुरूवात झाली आहे. यात १८ ते ४४ या वयोगटातील लोकांचा समावेश आहे. सरकारने पहिल्या दोन टप्प्यात लसीकरण सोप्या पद्धतीने केले मात्र यावेळी लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. नुकतेच सिरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांनी म्हटले होते की जानेवारीत जेव्हा केसेसे कमी होऊ लागल्या तेव्हा सरकारने कोरोनाकडे तितकेसे लक्ष दिले नाही आणि लसीच्या ऑर्डर मिळणे बंद झाले होते. या कारणामुळे सिरम इन्स्टिट्यूटने लस बनवण्याची क्षमता वाढवली नाही. तर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही दावे करण्यात आले की सरकारने पुरेशा लसींच्या ऑर्डर दिल्या नाहीत. यातच सरकारचे विधान आले आहे की लसीची ऑर्डर देण्यात आली आहे मात्र कंपन्या लसींचा पुरवठा करू शकत नाहीयेत. इतकंच की दुसऱ्या टप्प्यातील लसींची ऑर्डरही पूर्ण झालेली नाही. 

काय म्हटलंय सरकारने?

भारत सरकारने आपल्या विधानात म्हटले की सरकारकडून गेल्या महिन्यात १६० मिलियन लसींची ऑर्डर देण्यात आली होती. ही ऑर्डर तीन महिन्यांत पूर्ण केली जाणार होती. सरकारने २८ एप्रिलला ११० मिलियन कोविशील्ड लसी(सिरम इन्स्टिट्यूट) आणि ५० मिलियन कोवॅक्सिन(भारत बायोटेक)ची ऑर्डर दिली होती. सरकारने हेही म्हटले आहे की २८ एप्रिलला सिरम इन्स्टिट्यूटला १७३२.५ कोटी रूपये आणि भारत बायोटेकला ७८७.५ कोटी रूपयांचे पेमेंटही केले होते. सरकारने म्हटले की अशातच हे म्हणणे चुकीचे ठरेल की सरकारने नव्या ऑर्डर दिल्या होत्या. सरकारने पुढे असेही म्हटले की ऑर्डर आणि पेमेंट दिल्यानंतरही कंपन्या डिलीव्हरी पूर्ण करू शकल्या नाहीत. सिरम इन्स्टिट्यूटने १०० मिलियन डोसच्या ऑर्डरपैकी केवळ ८७.४ मिलियन डोसटी डिलीव्हरी केली आहे.तर भारत बायोटेकने ८.८१ मिलियन ऑर्डर डिलीव्हर केल्या आहेत. 

सरकारने कधी आणि किती दिल्या ऑर्डर्स

  1. सरकारने पहिल्या टप्प्यात ५६ मिलियन कोविशील्डची ऑर्डर दिली होती. यासाठी ११७६ कोटी रूपये दिले. तर १० मिलियन कोवॅक्सीनसाठी ३०९.७५ कोटी रूपये दिले. 
  2. दुसऱ्या टप्प्यात सरकारने १०० मिलियन कोविशील्डच्या ऑर्डरसाठी १५७५ रूपये दिले आणि २० मिलियन कोवॅक्सीनची ऑर्डर ३१५ कोटी रूपयांना दिली होती. दरम्यान, कंपन्या आतापर्य़ंत ही ऑर्डर पूर्ण करू शकलेल्या नाहीत. 
  3. तिसऱ्या टप्प्यात सरकारने ११० मिलियन कोविशील्डच्या ऑर्डरसाठी १७३२.५ कोटी रूपये आणि ५० मिलियन कोवॅक्सीनच्या ऑर्डरसाठी ७८७.५ कोटी रूपये दिले होते. 

पूनावाला धमकीमुळे घाबरून पळाले की बिझनेस वाढवण्यासाठी ब्रिटनमध्ये गेले?

लसीबाबत सरकारचे हे विधान आले आणि दुसरीकडे अदार पूनावाला यांनी युकेमध्ये लसीचा बिझनेस सुरू करण्याचा विचार केला आहे. लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे फार्मा कंपनी सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदार पूनावाला ब्रिटनला गेले आहेत. त्यांचा दावा आहे की भारतातील लोक त्यांना धमक्या देत आहे. यामुळे सरकारने त्यांना वाय कॅटेगरीमधील सुरक्षा दिली आहे. दरम्यान, पूनावाला धमक्यांना घाबरून ब्रिटनला पळून गेलेत की त्यांना बिझनेस वाढवायचा आहे म्हणून असा सवाल आता केला जात आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी