Compulsory Military Service : भारतात तरुणाईसाठी लष्करी सेवा सक्तीची होणार, केंद्र सरकारने दिले उत्तर

Compulsory Military Service for Youth : भारतात तरुणाईसाठी लष्करी सेवा सक्तीची होणार का असा प्रश्न अधूनमधून उपस्थित होत असतो. संसदेत पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित झाला. या प्रश्नाला संरक्षण मंत्रालयाकडून शुक्रवार २२ जुलै २०२२ रोजी उत्तर देण्यात आले.

Compulsory Military Service for Youth
लष्करी सेवा सक्तीची होणार का?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • लष्करी सेवा सक्तीची होणार का
  • केंद्र सरकारने दिले उत्तर
  • देशात सक्तीची लष्करी सेवा सुरू करण्याची कोणतीही योजना नाही

Compulsory Military Service for Youth : भारतात तरुणाईसाठी लष्करी सेवा सक्तीची होणार का असा प्रश्न अधूनमधून उपस्थित होत असतो. संसदेत पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित झाला. या प्रश्नाला संरक्षण मंत्रालयाकडून शुक्रवार २२ जुलै २०२२ रोजी उत्तर देण्यात आले. भारत सरकार देशात सक्तीची लष्करी सेवा सुरू करण्याबाबत कोणतीही योजना तयार करत नसल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. तरुणाईसाठी देशात सक्तीची लष्करी सेवा सुरू करण्याची कोणतीही योजना नाही, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. अग्निपथ योजनेत देशातील सैन्य शाळांची कोणतीही भूमिका नसेल, असेही संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

भारत सरकारने स्वयंसेवी संस्था, खासगी शाळांचे व्यवस्थापन आणि राज्य सरकार अशा वेगवेगळ्या व्यवस्थापनांसोबत १०० नव्या सैनिक शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सैनिक शाळा सुरू करण्याची योजना आहे. ही देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी लागू आहे. 

अग्निपथ योजना

भूदल, नौदल आणि वायुदल (हवाई दल) या सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये अग्निपथ योजनेद्वारे भरती होणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर नियुक्त केलेल्या अग्निविरांपैकी २५ टक्के अग्निविरांना सेवेत कायम केले जाईल. इतरांना आत्मसात केलेल्या कौशल्यांसाठी प्रमाणपत्र दिले जाईल तसेच पदवीधर झाल्याचेही प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्रांच्या आधारे सैन्यातील सेवेनंतर संबंधित तरुण इतर क्षेत्रात नोकरीसाठी अर्ज करू शकेल. सैन्याच्या सेवेतून संबंधित तरुण बाहेर पडेल त्यावेळी त्याच्याकडे २१व्या वर्षी २० लाख रुपये असतील. या पैशांतून तो एखाद्या व्यवसायाची सुरुवात करू शकेल. बँकांकडून अग्निविरांना वाजवी व्याजदराने कर्ज उपलब्ध होऊ शकेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी