कापूस नव्हता म्हणून जखमी महिलेच्या डोक्यावर लावले कंडोमचे पॅकेट, मध्य प्रदेशमधील धक्कादायक घटना

मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉस्पिटलमध्ये कापूस नव्हता म्हणून जखमी वृद्ध महिलेच्या डोक्यावर कंडोमचे पॅकेट लावले. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला त्यामुळे ही घटना समोर आली.

mp condom packet
जखमी वृद्ध महिलेच्या डोक्यावर कंडोमचे पॅकेट लावले.   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • एका हॉस्पिटलमध्ये कापूस नव्हता म्हणून जखमी वृद्ध महिलेच्या डोक्यावर कंडोमचे पॅकेट लावले.
  • या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला त्यामुळे ही घटना समोर आली.

Condom Packet Used : भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉस्पिटलमध्ये कापूस नव्हता म्हणून जखमी वृद्ध महिलेच्या डोक्यावर कंडोमचे पॅकेट लावले. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला त्यामुळे ही घटना समोर आली. (condom packet used instead cotton for injured women bandage in madhya pradesh)

अधिक वाचा : Hemant Soren : झारखंडचे सोरेन सरकार संकटात? ११ आमदार बैठकीला अनुपस्थित

मिळालेल्या माहितीनुसार मुरैना जिल्ह्यातील पोरसा भागात एका ७० वर्षीय महिलेच्या डोक्याला मार लागला होता. महिलेच्या डोक्यावर वीट पडली होती, त्यामुळे ही महिला जखमी झाली होती, डोक्यातून रक्त वाहत होतं. रक्तस्राव थांबत नव्हता म्हणून तिच्या कुटुंबीयांनी गावातल्या आरोग्य केंद्रात दाखल केले. तेव्हा तिथल्या कंपाऊंडरने कापूस नव्हता म्हणून कंडोमचा रिकामे पॅकेट जखमेवर लावले आणि बँडेज बांधले. तसेच पुढील उपचारासाठी कंपाऊंडरने त्यांन जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले.

अधिक वाचा : Monsoon Update: मुसळधार पावसाचा कहर, पूर आणि भूस्खलनात 31 जणांचा मृत्यू; अनेक बेपत्ता

जिल्हा रुग्णालयात पोहोचल्यानंतर महिलेची जखम असलेली पट्टी काढली तेव्हा डॉक्टर आणि कंपाऊंडर थक्कच झाले. तिच्या जखमेवर कापुस ऐवजी कंडोंमचे रिकामे पॅकेट लावण्यात आले होते. डॉक्टरांनी महिलेच्या डोक्यावरील ही पट्टी काढली. डोक्याला टाके लावून व्यवस्थित ड्रेसिंग केले आणि महिलेला घरी पाठवले. या पॅकेटमुळे महिलेला इन्फेक्शन झाले असते अशी माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच या महिलेच्या बाबतीत हलगर्जीपणा झाल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

अधिक वाचा : Road Accidents: 'या' देशात एकाच दिवशी दोन भीषण अपघात, 32 जणांचा मृत्यू; 52 हून अधिक जखमी

चौकशीचे आदेश

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकार्‍यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून कारवाई करण्याचे आदेशही वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले आहेत.

अधिक वाचा : Criminal Nurse : नर्सने रुग्णाचा घेतला गैरफायदा, नोकरी गमावून खातेय जेलची हवा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी