Information to ISI: पाकिस्तानी स्तंभलेखकाची कबुली; काँग्रेसच्या कार्यकाळातील भारत भेटीची प्रत्येक माहिती द्यायचा ISI ला

पाकिस्तानी (Pakistan) यंत्रणा अनेक मार्गांनी भारतात (india)घुसखोरी करत भारतातील महत्त्वाची माहिती मिळत असते. पाकिस्तानी पत्रकारही त्यांना या कामात मदत असल्याचं नुकतचे निदर्शनात आले आहे. सुप्रसिद्ध पाकिस्तानी स्तंभलेखक (Pakistani columnist) नुसरत मिर्झा (Nusrat Mirza) यांनी एका मुलाखतीत कबूल केले आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) साठी महत्त्वाची माहिती गोळा करण्यासाठी ते काँग्रेसच्या काळात अनेकदा भारतात आले होते.

Pakistani journalist spying in India, helping ISI
पाकिस्तानी पत्रकाराची भारतात हेरगिरी, ISI ला करायचा मदत   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शकील चौधरी यांनी घेतलेल्या मुलाखतीत खुलासा
  • भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याकडून नुसरत मिर्झा यांना भारतात येण्याचे निमंत्रण
  • जफरुल-इस्लाम खान हे दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्षांची भेट

नवी दिल्ली : पाकिस्तानी (Pakistan) यंत्रणा अनेक मार्गांनी भारतात (india)घुसखोरी करत भारतातील महत्त्वाची माहिती मिळत असते. पाकिस्तानी पत्रकारही त्यांना या कामात मदत असल्याचं नुकतचे निदर्शनात आले आहे. सुप्रसिद्ध पाकिस्तानी स्तंभलेखक (Pakistani columnist) नुसरत मिर्झा (Nusrat Mirza) यांनी एका मुलाखतीत कबूल केले आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) साठी महत्त्वाची माहिती गोळा करण्यासाठी ते काँग्रेसच्या काळात अनेकदा भारतात आले होते. तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कार्यकाळात त्यांना अनेकवेळा भारतभेटीचे निमंत्रण देण्यात आले होते. पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शकील चौधरी यांना दिलेल्या मुलाखतीत स्तंभलेखक मिर्झा यांनी या गोष्टी सांगितल्या आहेत.

काँग्रेसच्या राजवटीत अनेकवेळा केली भारत भेट 

काँग्रेसच्या राजवटीत अनेकवेळा भारत भेट दिलेल्या नुसरत मिर्झाने कॅमेऱ्यासमोर कबूल केले की ते सतत आयएसआय अधिकाऱ्यांना या दौऱ्याची माहिती देत ​​असे.

पाच वेळा भारत दौरा 

नुसरत मिर्झा यांनी सांगितले की, मी पाच वेळा भारताला भेट दिली आहे. त्यांनी 2011 च्या दौऱ्याचा उल्लेख केला. या मुलाखतीत मिर्झा यांनी भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे नाव घेतले आहे. अन्सारी 2007 ते 2017 पर्यंत भारताचे 12 वे उपराष्ट्रपती होते. मिर्झा म्हणाले की, "मला त्यांच्या कार्यकाळात भारतात बोलावण्यात आले होते. मी पाकिस्तानात परतल्यावर, आयएसआय अधिकाऱ्याने त्यांना जी काही माहिती गोळा केली होती ती आयएसआयचे नवीन प्रमुख जनरल कियानी यांना देण्यास सांगितले." 

Read Also : आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता

तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारींनी दिले होते निमंत्रण 

मिर्झा म्हणाले, "मला १२वे उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांचे निमंत्रण मिळाले होते. मी पाच वेळा भारतात गेलो.  यादरम्यान मी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, पाटणा आणि कोलकाता येथेही गेलो. 2011 मध्ये मी मिल्ली गॅझेटियर वृत्तपत्राचे मालक जफरुल इस्लाम खान यांनाही भेटलो. जफरुल-इस्लाम खान हे दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय मुस्लिमांसाठी एक प्रमुख वृत्त स्रोत असलेल्या मिल्ली गॅझेटियरचे संस्थापक-संपादक आहेत.

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून अनेक विशेष सुविधा

मिर्झा यांनी सांगितले की, माझ्या भारत भेटीदरम्यान मला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अनेक विशेष सुविधा मिळत होत्या. साधारणपणे भारतातील व्हिसा अर्जदारांना तीन ठिकाणी जाण्याची परवानगी होती.  नोव्हेंबर 2002 ते नोव्हेंबर 2007 या काळात परराष्ट्र मंत्री राहिलेल्या खुर्शीद कसुरी यांच्या मदतीने मला सात शहरांना भेट देण्यासाठी व्हिसा मिळाला.

Read Also : ईदनिमित्त शाहरुख खानने चाहत्यांना दिलं खास गिफ्ट

भारतात काँग्रेसचे शासन असताना दहशतवादावरील एका चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी ते भारतात आले होते. भारतातील उर्दू वृत्तपत्रांचे सर्व संपादक त्यांचे मित्र आहेत. नुसरत यांनी सांगितले की, आयएसआयचं विशेष गट भारतीय राजकीय नेत्यांवर लक्ष ठेवून आहे. ते भारतीय नेत्यांचा कमकुवतपणा जाणून आहेत. परंतु अनुभव कमी असल्याने ते त्याचा आपल्या हितासाठी वापर करु शकत नाहीत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी