चिनी सैन्याशी पुन्हा एकदा झटापट, भारतीय जवानांनी घुसखोरी हाणून पाडली

सिक्कीमच्या नाकू ला येथे चीनी सैन्याने आज (सोमवार) घुसखोरी करण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने याला जोरदार विरोधक करत त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.

confrontation between indian and chinese troops
चिनी सैन्याशी पुन्हा झटापट, जवानांनी घुसखोरी हाणून पाडली (फाइल फोटो)  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • चीनकडून सातत्याने आगळीक सुरुच
  • भारतीय सैन्याने सिक्कीमच्या नाकू लामध्ये चिनी सैन्यांची घुसखोरी हाणून पाडली
  • या झटापटीत अनेक चिनी सैनिक जखमी झाले

नवी दिल्ली: लडाखच्या पूर्व भागात तणावादरम्यान चिनी सैन्याने पुन्हा एकदा आगळीक केली आहे. परंतु भारतीय सैन्याने चिनी सैन्याचा डाव हाणून पाडला आहे. नुकत्याच मिळालेल्या वृत्तानुसार, सिक्किमच्या नाकू लामध्ये भारतीय सैन्याची चिनी सैनिकांशी नाकू लाजवळ झडप झाली. पण भारताच्या शूर जवानांनी या झटापटीनंतर देखील चीनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. परंतु या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की चीनला सीमा विवाद किंवा एलएसीवरील वाद कायम ठेवायचा आहे. नाकू ला सेक्टर गे समुद्रसपाटीपासून तब्बल ५,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर आहे.

गेल्या आठवड्यात झाली होती झटापट

गेल्या आठवड्यात देखील पीपुल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चीनी सैनिकांना रोखलं होतं. तेव्हा देखील दोन्ही सैन्यामध्ये जोरदार झटापट झाली होती. ज्यामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. दरम्यान, आज झालेल्या चकमकी दरम्यान कोणतेही शस्त्र वापरण्यात आले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे समजते आहे. दरम्यान, गेल्या वर्षी एप्रिल/मे महिन्यात पूर्व लडाखमधील अनेक ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न चीनकडून झाला होता. 

लडाखमधील पूर्वेकडील भागात तणाव अद्यापही कायम 

दरम्यान, गेल्या वर्षी जून महिन्यात चिनी सैन्याने गलवान खोऱ्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी झालेल्या चकमकीत, चिनी सैन्याच्या ५९ सैनिकांना यमसदनी धाडण्यात आलं होतं. तर भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्या घटनेनंतर अद्यापही लडाखच्या पूर्वेकडील भागात तणाव कायम आहे. हा तणाव संपविण्यासाठी आतापर्यंत दोन्ही देशाकडील उच्च स्तरावर चर्चेच्या ९ फेऱ्या झाल्या आहेत. नुकतंच म्हणजे काल (२४ जानेवारी) चीनकडील भागात मोल्डो येथे देखील सुमारे १५ तास चर्चा झाली. परंतु दोन्ही बाजू निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत.

एकीकडे चीन भारतीय लष्कराच्या उच्चपदस्थांशी चर्चा करत असल्याचं चित्र निर्माण करत आहेत. तर दुसरीकडे त्यांचं सैन्य भारतीय भूभागावर ताबा मिळविण्यासाठी हिंसक प्रयत्न करत आहेत. आजच्या घटनेनंतर चीनचा हा दुटप्पीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे सीमारेषेवरील अधिक सतर्क झाले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी