काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत सांबित पात्राला म्हणाल्या घाणेरड्या नाल्यातील किडा

लोकल ते ग्लोबल
Updated May 31, 2021 | 13:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्यात टीव्हीवरील चर्चेदरम्यान वाद झाला. मोदी सरकारच्या कार्यकाळाला 7 वर्षे झाल्याच्या निमित्ताने ही चर्चा होती.

Sambit Patra and Supriya Shrinate
टीव्हीवरील चर्चेदरम्यान काँग्रेस आणि भाजपाच्या प्रवक्त्यांनी ओलांडल्या सभ्यतेच्या मर्यादा  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांमध्ये झाले वादंग
  • भारत आणि चीनच्या मुद्द्यावरून पेटले दोन्ही प्रवक्ते
  • पात्रा यांना म्हटले घाणेरड्या नाल्यातील किडा

नवी  दिल्ली: मोदी सरकारच्या (Modi government) कार्यकाळाला (tenure) आता 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सर्व माध्यमसंस्थांनी (media houses) त्यांच्या सरकारच्या कामगिरीबाबत (performance) चर्चा (debates) आयोजित केल्या आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला (second term) दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अनेक सर्वेक्षणेही (surveys) होत आहेत. अशीच एक चर्चा आजतक (Aaj Tak) या वृत्तवाहिनीवर (news channel) सुरू होती. यात एका बाजूने भाजपचे प्रवक्ते (BJP spokesperson) संबित पात्रा (Sambit Patra) आणि दुसरीकडे काँग्रेसच्या प्रवक्त्या (Congress spokesperson) सुप्रिया श्रीनेत (Supriya Shrinate) होत्या.

दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांमध्ये झाले वादंग

काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी मोदी सरकारवर बेरोजगारी, कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयश, दारिद्र्यरेषा असे अनेक आरोप केले. त्यांचे म्हणणे होते की भाजपने येऊन देशातील सर्व मोठ्या संस्थांचेही नुकसान केले आहे. श्रीनेत यांनी म्हटले की तुमचे सरकार तर चीनचे नाव घ्यायलाही घाबरते तर इंदिरा गांधीनी जगाचा भूगोल बदलून पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. यावर संबित पात्रा भडकले आणि दोघांमध्ये वादंग सुरू झाले.

भारत आणि चीनच्या मुद्द्यावरून पेटले दोन्ही प्रवक्ते

भारत आणि चीनच्या मुद्द्यावरून सुरू असलेली ही चर्चा देशद्रोहापर्यंत गेली. संबित पात्रा म्हणाले की मी सांगतो देशद्रोह काय असतो. यानंतर ते म्हणाले की जेव्हा डोकलाममध्ये तणाव होता तेव्हा काँग्रेसचे कुटुंब चायनीज तंबूच्या खाली पकडले गेले. त्यांनी सुरुवातीला नकार दिला, पण जेव्हा फोटो समोर आले तेव्हा म्हणाले की हो, आम्ही गेलो होतो. ते तिथे थांबले नाहीत तर त्यांनी 2008च्या घटनेचा उल्लेख केला आणि म्हटले की आई आणि मुलगा (सोनिया आणि राहुल गांधी) दोघे चीनला जातात आणि तिथे जाऊन स्वाक्षऱ्या करून येतात आणि न जाणो किती पैशांची देवाणघेवाण होते.

पात्रा यांना म्हटले घाणेरड्या नाल्यातील किडा

सुप्रिया श्रीनेत आणि संबित पात्रा यांच्यातील हा वाद वाढत गेला आणि श्रीनेत म्हणाल्या की आता हे जोकरगिरी करतील. तेवढ्यात पात्रा म्हणाले की राहुल गांधीना हटवा. त्या राहुल गांधींचे नाव का घेत आहेत. यानंतर थोडी वादावादी झाली आणि सुप्रिया श्रीनेत यांनी संबित पात्रा यांना घाणेरड्या नाल्यातील किडा म्हटले. याचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत पात्रा यांनी श्रीनेत यांच्यावर टीका केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी