Sonia Gandhi News: सोनिया गांधींना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोना

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोनिया गांधींना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती ट्वीट करून दिली.

Congress interim president Sonia Gandhi tests positive for COVID 19 again
सोनिया गांधींना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोना  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सोनिया गांधींना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोना
  • काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली माहिती
  • ट्वीट करून दिली माहिती

नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोनिया गांधींना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती ट्वीट करून दिली. कोरोनाबाधीत झाल्यामुळे सोनिया गांधी घरातच क्वारंटाइन झाल्या आहेत. वैद्यकीय सूचनांचे पालन करत त्या उपचार करून घेत आहेत. 

याआधी जूनमध्ये सोनिया गांधी यांना कोरोनाची बाधा झाली होती. प्रियांका गांधी यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. आता ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा सोनिया गांधींनी कोरोनाची बाधा झाली आहे. 

जूनमध्ये तब्येत बिघडल्यामुळे कोरोनावरील उपचार घेण्यासाठी काही दिवस सोनिया गांधी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. तब्येत सुधारल्यानंतर त्या घरी परतल्या आणि काही दिवस होम क्वारंटाइन राहून उपचार घेत आराम करत होत्या. 

सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या प्रमाणेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे प्रचार प्रमुख पवन खेडा, काँग्रेस प्रवक्ते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह आणखी काही काँग्रेस नेत्यांनाही मागील काही दिवसांत कोरोनाची बाधा झाली होती.

ईडी सध्या नॅशनल हेराल्ड आणि यंग इंडिया या दोन कंपन्या तसेच काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवार या सर्वांच्या एकमेकांशी संबंधित आर्थिक व्यवहारांची तपासणी करत आहे. या प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीसाठी सोनिया गांधी यांना पहिल्यांदा समन्स आले नंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त आले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी