My Tiranga My Pride : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी समस्त देशवासियांना आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवर (Soicial Media) तिरंगा (Tricolor) असलेला डीपी (Display Picture) लावण्याचे आवाहन केले होते. त्यावर काँग्रेसने (Congress) आपल्या ट्विटर अकाऊंटवर (Twitter Account) तिरंगा हातात असलेल्या जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru) यांचा फोटो लावला आहे. तसेच संघाने (RSS) अजूनही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तिरंगा लावलेला नाही यावरून टीकास्त्र सोडले आहे. ज्यांनी स्वातंत्र्यापासून ५२ वर्षे आपल्या मुख्यालयावर तिरंगा फडकावला नाही ते लोक पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देतीला का? असा सवाल उपस्थित केला आहे.
अधिक वाचा : China Taiwan Memes : WWIII सोशल मीडियावर ट्रेंड, नेटकर्यांनी शेअर केले भन्नाट मीम्स
काँग्रेसचे महासविच जयराम रमेश यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “१९२९ साली लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनात रावी नदीच्या तिरावर पंडित नेहरु यांनी तिरंग फडकावला होता, तेव्हा नेहरु म्हणाले होते की,”आता हा तिरंगा फडकावल आहे, जोपर्यंत भारतात पुरुष, बाई आणि लहान मुलं जिवंत आहेत तोपर्यंत हा तिरंगा झुकता कामा नये’ देशवासियांनी असेच केले असे जयराम रमेश म्हणाले.
वर्ष 1929 के लाहौर अधिवेशन में रावी नदी के तट पर झंडा फहराते हुए पंडित नेहरू ने कहा था "एक बार फिर आपको याद रखना है कि अब यह झंडा फहरा दिया गया है। जब तक एक भी हिंदुस्तानी मर्द, औरत, बच्चा जिंदा है, यह तिरंगा झुकना नहीं चाहिए।" देशवासियों ने ऐसा ही किया।#MyTirangaMyPride — Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 3, 2022
हम हाथ में तिरंगा लिए अपने नेता नेहरू की DP लगा रहे हैं। लेकिन लगता है प्रधानमंत्री का संदेश उनके परिवार तक ही नहीं पहुंचा। जिन्होंने 52 सालों तक नागपुर में अपने हेड क्वार्टर में झंडा नहीं फहराया, वे क्या प्रधानमंत्री की बात मानेंगे? #MyTirangaMyPride https://t.co/JOiTkYC9cY — Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 3, 2022
जयराम रमेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना म्हणाले की, आम्ही नेहरुंचा फोटो लावत आहोत, नेहरुंनी हातात तिरंगा घेतला आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदीचा संदेश त्यांच्या कुटुंबीयांकडे पोहोचलेला दिसत नाही. ज्यांनी ५२ वर्षांत नागपुरात आपल्या मुख्यालयात तिरंगा फडकावला नाही ते पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देतील का असेही जयराम रमेश म्हणाले आहेत.
काँग्रेस नेते पवर खेडा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचे ट्विटर अकाऊंतचा डीपीचा स्क्रीनशॉट शर केला आहे तसेच संघवाल्यांनो आता तरी तिरंगा आपला करूना घ्या असे म्हटले आहे.
संघ वालों, अब तो तिरंगे को अपना लो #MyTirangaMyPride https://t.co/mYQPiuAB58 pic.twitter.com/TMVcpfu3eA — Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) August 3, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्र्यांनी आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रोफाईलवरील डीपीवर तिरंगा लावला आहे तसेच नेटकर्यांना फोटो अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमात म्हणाले होते की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे रुपांतर जन आंदोलनात होत आहे. नागरिकांनी २ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपासून आपल्या सोशल मीडियावर तिरंगा अपडेट करण्याचे आवाहन केले होते.