Digvijaya Singh : दिग्विजय सिंहांची कार आणि दुचाकीची टक्कर, 1 जखमी

Congress leader Digvijaya Singh car collides with two-wheeler in MP Rajgarh : काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या कारची आणि एका दुचाकीची टक्कर झाली.

Congress leader Digvijaya Singh car collides with two-wheeler in MP Rajgarh
दिग्विजय सिंहांची कार आणि दुचाकीची टक्कर, 1 जखमी  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • दिग्विजय सिंहांची कार आणि दुचाकीची टक्कर, 1 जखमी
  • मध्य प्रदेशात झाला अपघात
  • पोलिसांनी ताब्यात घेतली दिग्विजय सिंह यांची कार

Congress leader Digvijaya Singh car collides with two-wheeler in MP Rajgarh : काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या कारची आणि एका दुचाकीची टक्कर झाली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. दुचाकीस्वाराच्या डोक्याला दुखापत झाली. ही घटना मध्य प्रदेशमधील राजगड (Rajgarh) जिल्ह्यात घडली. मध्य प्रदेशमधील राजगड (Rajgarh) जिल्ह्यात जिरापूर जवळ विजय कॉन्व्हेंट शाळेजवळ अपघात झाला. 

अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वार रामबाबू बागरी (20, रा. परोलिया) याला  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तातडीच्या उपचारांनंतर त्याची तब्येत स्थिर झाली. यानंतर त्याला भोपाळच्या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दुचाकीस्वार रामबाबू बागरीवरील उपचारांचा खर्च दिग्विजय सिंह यांच्यावतीने करण्यात येत आहे. 

दुचाकीस्वाराने दिलेल्या माहितीआधारे पोलिसांनी दिग्विजय सिंह यांच्या कारच्या ड्रायव्हर विरोधात हलगर्जीपणे कार ड्राइव्ह केल्याची तक्रार नोंदवली आहे. तपासाचा भाग म्हणून ज्या कारमुळे अपघात झाला ती दिग्विजय सिंह यांची कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. 

Womens Day : महिलांनी करून घ्याव्या या आरोग्य तपासण्या

लांबसडक सुंदर केसांसाठी खा हे पदार्थ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी