Congress: काँग्रेसला नेता सापडेना; अध्यक्षपदाची खुर्ची अद्याप रिकामीच

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 12, 2019 | 21:20 IST | मनोज यादव

Congress: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन जवळपास ५५ दिवस झाले आहेत. पण, अजूनही राहुल यांच्या जागी नव्या अध्यक्षांचा शोध सुरूच आहे. यावरून आत पक्षात नेत्यांमध्ये खद्खद् सुरू झाली आहे.

Rahul Gandhi file photo
काँग्रेस झाली नेतृत्वहीन   |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • कोण असेल काँग्रेसचा नवा अध्यक्ष
  • काँग्रेसने आता कात टाकण्याची गरज
  • काँग्रेसच्या अवस्थेला कोण जबाबदार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. सलग दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसेतर पक्ष सत्तेत येण्याची भारताच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. काँग्रेस या पराभवाच्या धक्क्यतातून अद्याप सावरलेली नाही. काँग्रेस नेते पराभवानंतरही पराभव मानून बसले आहे. आता काँग्रेस नेते करत काय आहेत, असा विचारला जात आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन जवळपास ५५ दिवस झाले आहेत. पण, अजूनही राहुल यांच्या जागी नव्या अध्यक्षांचा शोध सुरूच आहे. काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी पर्यायच उभा राहत नसल्याने पक्षात आता खदखद सुरू झाली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी उशीर होत असल्यामुळे ज्येष्ठ नेत्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ज्येष्ठ नेते कर्णसिंह आणि त्यानंतर जनार्दन द्विवेदी यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

कोण असेल पुढचा अध्यक्ष?

राहुल गांधी यांनी ‘मी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे लवकरात लवकर नव्या अध्यक्षांची नियुक्ती करावी,’ असे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीपुढे स्पष्ट केले आहे. पण, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. कार्यकारिणीने राहुल गांधी यांना राजीनामा मागे घेण्याचे आवाहन केले होते. राहुल गांधींनी मात्र आपला निर्णय ठाम असल्याचे कार्यकारिणीला सांगितले आहे. त्यानंतर काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना समजावण्याचा प्रयत्न केला. तरी देखील राहुल यांनी आपला निर्णय बदलेला नाही. अध्यक्षपदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा झाली. अमुक एका नेत्याचे नाव आघाडीवर, अशा अनेक बातम्या आल्या पण, त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. काँग्रेसचे अनेक नेते असे म्हणत आहेत की, ‘आम्ही पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले तरी आम्हाला काय मिळणार आहे? आम्हाला सत्ताधारी पक्षाच्या टीकेलाच सामोरं जावं लागेल. आम्हाला खुलेपणाने काम करता येणार नाही. केवळ गांधी कुटुंबाचे प्यादे म्हणूनच आम्ही काम करू.’ मुळात काँग्रेस गांधी कुटुंबाशिवाय अपुरी आहे. काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाच्या अनुमतीशिवाय पानही हालत नाही. आता अशी परिस्थिती असेल तर, राहुल गांधी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे ढोंग का करत आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत जर, काँग्रेसमध्ये काही हालचाल झाली नाही तर, काँग्रेस इतिहास जमा होईल.

कर्तृत्वान नेतृत्व उदयास येऊ दे

काँग्रेसने आता कर्तृत्ववान लोकांना संधी द्यायला हवी. अन्यथा पुढच्या निवडणुकांमध्ये त्यांना एक-दोन जागाच मिळतील. काँग्रेस नेतृत्वहीन असल्यामुळे आता आणखी कमकुवत झाली आहे. काँग्रेसमध्ये कोणी प्रवेश करण्यास इच्छुक नाही आणि जे काँग्रेसमध्ये आहेत. त्यांना कधी एकदा पक्ष सोडतोय, असे झाले आहे. गोवा काँग्रेसमध्ये झाले ते त्याचे उत्तम उदाहरण आहे. कर्नाटकात आघाडीचे सरकार आहे. तेथेही नेते काँग्रेसमध्ये थांबण्यास इच्छुक आहेत की नाहीत, हे स्पष्टपणे सांगता येत नाही.

याला जबाबदार कोण?

नेतृत्वहीन होत असलेल्या काँग्रेसला कोठेही आधार मिळताना दिसत नाही. एक क्षण असा येईल की सगळं काही संपुष्टात येईल. कर्नाटक, गोवा, राजस्थानात याची सुरुवात झाली आहे. त्यातून हे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसचे भविष्य अंधःकारमय होताना दिसत आहे. हळूहळू हे लक्षात येत आहे. काँग्रेसच्या या परिस्थितीला कोण जबाबदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा खरचं काँग्रेस मुक्त भारत या संकल्पनेत पाऊल टाकू लागले आहेत? की, काँग्रेसला या संकटातून बाहेर पडण्याचा रस्ताच दिसत नाही? या परिस्थितीला काँग्रेस स्वतःच जबाबदार आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला दोष देण्यात काही अर्थ नाही.

(महत्त्वाची टीम : मनोज यादव हे मुक्त लेखक आहे. त्यांचे विचार हे वैयक्तिक आहेत. त्यांच्या विचारांशी टाइम्स नेटवर्कचा कोणताही संबंध नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Congress: काँग्रेसला नेता सापडेना; अध्यक्षपदाची खुर्ची अद्याप रिकामीच Description: Congress: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन जवळपास ५५ दिवस झाले आहेत. पण, अजूनही राहुल यांच्या जागी नव्या अध्यक्षांचा शोध सुरूच आहे. यावरून आत पक्षात नेत्यांमध्ये खद्खद् सुरू झाली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles