Santokh Singh Chaudhary : भारत जोडो यात्रेत सहभागी काँग्रेस खासदाराचा Heart Attack ने मृत्यू

congress mp Santokh Singh Chaudhary died after heart attack during bharat jodo yatra : भारत जोडो यात्रेत सहभागी काँग्रेस खासदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

congress mp Santokh Singh Chaudhary died after heart attack during bharat jodo yatra
भारत जोडो यात्रेत सहभागी काँग्रेस खासदाराचा Heart Attack ने मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारत जोडो यात्रेत सहभागी काँग्रेस खासदाराचा Heart Attack ने मृत्यू
  • काँग्रेस अध्यक्षांनी व्यक्त केला शोक
  • कोण होते चौधरी संतोख सिंह?

congress mp Santokh Singh Chaudhary died after heart attack during bharat jodo yatra : भारत जोडो यात्रेत सहभागी काँग्रेस खासदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जालंधर येथील खासदार चौधरी संतोख सिंह यांचे निधन झाले. 

पंजाबमधील फिल्लौर येथून भारत जोडो यात्रा जात होती. या यात्रेत खासदार चौधरी संतोख सिंह सहभागी झाले. चालत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. तब्येत ढासळल्यामुळे त्यांना अँब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. मृत्यूचे कारण हृदयविकाराच्या झटका हे असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. खासदाराच्या मृत्यूनंतर भारत जोडो यात्रा स्थगित करण्यात आली आहे. 

खासदार चौधरी संतोख सिंह यांच्या निधनाचे वृत्त कळताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्वीट करून शोक प्रकट केला. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनीही खासदार चौधरी संतोख सिंह यांच्या निधनाचे वृत्त कळताच ट्वीट करून शोक प्रकट केला.

कोण होते चौधरी संतोख सिंह?

संतोख सिंह चौधरी यांचा जन्म 18 जून 1946 रोजी पंजाबमधील जालंधरच्या धालीवाल येथे झाला. ते 76 वर्षांचे होते. संतोख सिंह चौधरी हे 1 सप्टेंबर 2014 पासून जालंधरचे खासदार होते. याआधी ते पंजाबच्या काँग्रेस सरकारमध्ये माजी कॅबिनेट मंत्री पण होते.

Unhealthy food for kids: सावधान! मुलांना चुकूनही देऊ नका हे पदार्थ, पडेल महागात

पेरू खाणे पुरुष आणि गरोदर महिलांसाठी फायद्याचे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी