अयोध्येप्रकरणी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया 

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 09, 2019 | 12:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या ऐतिहासिक निकालावर काँग्रेसने आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रामाच्या नावाने आता देशात कोणीही राजकारण करणार नाही.

 Congress on Ayodhya Verdict welcome the SC verdict politics news in marathi google newsstand
अयोध्येप्रकरणी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सुप्रीम कोर्टाच्या अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक निकाल
  • काँग्रेसने दिली पहिली प्रतिक्रिया
  • काँग्रेसच्या पहिल्या प्रतिक्रियेत भाजपला टोला

नवी दिल्ली :  सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या ऐतिहासिक निकालावर काँग्रेसने आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रामाच्या नावाने आता देशात कोणीही राजकारण करणार नाही. त्याचा वापर यापुढे राजकारणासाठी करणार नाही असा टोला काँग्रेसने भाजपला लगावला आहे. 

काँग्रेसने अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे स्वागत केले आहे. दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ता रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले होते की अयोध्या प्रकरणी जो काही निर्णय येणार तो आम्हांला मान्य असणार आहे. सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आता या निर्णयानंतर लोकांनी आता शांतता राखावी असे आवाहनही काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे. 

 

अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचवेळी मुस्लिमांना पर्यायी जागा देण्याचा निर्णयही न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जागा तीन अर्जदारांमध्ये विभागण्याची चूक केली. वादग्रस्त जागा हिंदूना देण्यात येईल. तर मुस्लिमांना मशिदीसाठी वेगळी जमीन देण्यात येईल. याबाबत केंद्र सरकार तीन महिन्यात योजना आखेल आणि राम मंदिर बांधण्यासाठी सरकार ट्रस्ट तयार करेल. तर अयोध्येत महत्त्वाच्या ठिकाणी मशीद बनवण्यासाठी जागा दिली जाईल, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...