Congress : काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

Congress President election will be held on October 17, counting of votes on October 19, decision in CWC meeting : व्हर्च्युअल पद्धतीने काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्यात आला.

Congress President election will be held on October 17
Congress : काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Congress : काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
  • काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान, १९ ऑक्टोबर २०२२ रोजी मतमोजणी
  • नामांकनाची प्रक्रिया २४ सप्टेंबर २०२२ पासून सुरू

Congress President election will be held on October 17, counting of votes on October 19, decision in CWC meeting : व्हर्च्युअल पद्धतीने काँग्रेस कार्यसमितीची (काँग्रेस वर्किंग कमिटी - CWC or Congress Working Committee) बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्यात आला. हा कार्यक्रम बैठकीअंती जाहीर करण्यात आला.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान पार पडेल आणि १९ ऑक्टोबर २०२२ रोजी मतमोजणी होईल. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी २२ सप्टेंबर २०२२ रोजी अधिसूचना काढली जाईल आणि नामांकनाची प्रक्रिया २४ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होईल. नामांकनाची मुदत ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपेल. या निवडणूक कार्यक्रमाला काँग्रेसच्या कार्यसमितीने बैठकीत औपचारिक मंजुरी दिली.

पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करण्यासाठी झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत व्हर्च्युअल पद्धतीने हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे सहभागी झाले होते. 

लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला नव्या अध्यक्षाची निवड करता आलेली नाही. पूर्ण वेळ अध्यक्ष उपलब्ध नसल्यामुळे पक्षाने सोनिया गांधी यांना हंगामी अध्यक्ष केले आहे. 

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. यानंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. याआधी आझाद यांनी राजीनामा देताना राहुल गांधी यांच्यावर अपरिपक्व आणि बालिश कृत्य करणारी व्यक्ती अशा स्वरुपाची टीका केली. तर काँग्रेसने आझाद यांच्यावर पक्षाची फसवणूक केल्याचा आरोप केला. आझाद यांचा डीएनए मोदीमय झाला आहे, अशीही टीका काँग्रेसने केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी