Congress President ED: सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी, कार्यकर्त्यांकडून हिंसक निदर्शने; कार पेटवली

Sonia Gandhi's Questioning by Enforcement Directorate: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांची गुरुवारी चौकशी करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.

congress president sonia gandhi questioned by ed violent protests by congress activists car was set on fire
सोनिया गांधींची ईडी चौकशी, कार्यकर्त्यांनी कार पेटवली!  
थोडं पण कामाचं
  • ईडीकडून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी
  • नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधींची चौकशी
  • अंमलबाजावणी संचालनालयाच्या चौकशीविरोधात काँग्रेसचं हिंसक आंदोलन

Sonia Gandhi: नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज (21 जुलै) ईडीकडून (ED) चौकशी करण्यात आली. याच चौकशीच्या विरोधात बंगळुरूमध्ये युवक काँग्रेसने (Congress) हिंसक निदर्शने केली. ईडी कार्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांनी कार पेटवली. दुसरीकडे दिल्लीतही काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने करत होते. येथे पोलिसांनी आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पाण्याच्या फवारे वापरले. (congress president sonia gandhi questioned by ed violent protests by congress activists car was set on fire)

आंदोलक कार्यकर्त्यांना  घेतले ताब्यात

सोनिया गांधी यांच्या चौकशीला विरोध करणाऱ्या युवक काँग्रेस, सेवादलाचे नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ईडी कार्यालयाभोवती कलम 144 लागू आहे. येथे निदर्शनास परवानगी देण्यात आलेली नाही. यावेळी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते यांची पोलिसांशी झटापट देखील झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही केली.

अधिक वाचा: Fun over GST : शशी थरूर, पनीर बटर मसाला आणि जीएसटी, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

दरम्यान, काँग्रेसचे खासदार राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) चौकशीदरम्यानही काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते काँग्रेस मुख्यालय, ईडी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमले होते आणि त्यांनी 'सत्याग्रह' आणि निदर्शने केली होती. सोनिया गांधींच्या चौकशीवेळीही या ठिकाणी काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते जमले. जे या चौकशीविरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते पक्ष मुख्यालयाबाहेर निदर्शने करत आहेत.

अधिक वाचा: National Herald Case: अखेर तो दिवस आला, आज दिल्लीत काँग्रेस नेते उतरणार रस्त्यावर

केंद्राच्या कोणत्या तरी एजन्सीने पहिल्यांदाच काँग्रेस अध्यक्षांची चौकशी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ईडीच्या या चौकशीला विरोध करण्यासाठी काँग्रेसने एक रणनीती आखली आहे. रणनीती निश्चित करण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी काँग्रेस नेत्यांची बैठकही झाली होती. 

'पक्ष सोनिया गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा'

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) म्हणाले की, 'पक्ष सोनिया गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. नॅशनल हेराल्ड पेपरची स्थापना जवाहरलाल नेहरू यांनी 1938 मध्ये इतर स्वातंत्र्यसैनिकांसह केली होती.'

अधिक वाचा: राजकीयदृष्ट्या राहुल गांधी अनुत्पादक : स्मृती इराणी

तर दुसरीकडे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी म्हणतात की, 'यंग इंडियन लिमिटेडने चुकीच्या पद्धतीने नॅशनल हेराल्डची मालमत्ता स्वतःकडे हस्तांतरित केली आहे.' याच सगळ्या प्रकरणात ईडीने आधी राहुल गांधी यांची चौकशी केली आणि आता ते सोनिया गांधी यांची चौकशी करत आहेत. मात्र, ही संपूर्ण चौकशी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळेच देशातील अनेक भागात या चौकशीविरोधात काँग्रेसने जोरदार आंदोलनं सुरु केली आहेत.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी