National Herald Case: अखेर तो दिवस आला, आज दिल्लीत काँग्रेस नेते उतरणार रस्त्यावर

Sonia Gandhi ED Summons: नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज ईडीसमोर हजर राहणार आहेत. ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधीही उपस्थित राहणार आहेत.

Sonia Gandhi News
सोनिया गांधी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज सोनिया गांधी (Sonia Gandhi) आज ईडीसमोर (ED) हजर राहणार आहेत.
  • याआधी दोन वेळा म्हणजेच 8 जून आणि 23 जूनला आजारपणामुळे त्यांना ईडीसमोर हजर राहता आलं नव्हतं.
  • नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगसंदर्भात (Money Laundering) ईडी सोनिया गांधी यांची चौकशी करणार आहे.

नवी दिल्ली: Sonia Gandhi News: आज अखेर तो दिवस आला आहे. कारण आज सोनिया गांधी (Sonia Gandhi) आज ईडीसमोर  (ED) हजर राहणार आहेत. याआधी दोन वेळा म्हणजेच 8 जून आणि 23 जूनला आजारपणामुळे त्यांना ईडीसमोर हजर राहता आलं नव्हतं. पण आता सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची तब्येत ठिक असल्यानं त्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत.   नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगसंदर्भात (Money Laundering) ईडी सोनिया गांधी यांची चौकशी करणार आहे. सोनिया गांधी यांच्याआधी राहुल गांधी यांनी ईडी समोर या प्रकरणासंदर्भात चौकशीसाठी हजेरी लावली होती.  राहिले होते. ईडीनं त्यांची 5 दिवस चौकशी केली होती. 

मुंबईत ईडीविरोधात आंदोलन

दरम्यान आज काँग्रेस ईडी विरोधात राज्यभर आंदोलन करणार आहे. सकाळी 11 वाजता मुंबईच्या ईडी कार्यालयावर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला जाणार आहे. आज केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे नेते मुंबईच्या ईडी कार्यालयावर मोर्चा काढतील. सकाळी 11 वाजता जीपोओ चौकातून निघणाऱ्या मोर्चात नाना पटोले, भाई जगताप, अशोक चव्हाण, चरणसिंह सप्रा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसकडून ईडीविरोधात आंदोलनं केली जाणार आहेत. 

अधिक वाचा-  JEE Main 2022 : जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा २५ जूनपासून

काँग्रेस पक्षाचे नेते जाणार ईडी कार्यालयात 

दुसरीकडे सोनिया गांधी यांच्यासोबत एकजूट दाखवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेतेही ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. त्यामुळे संसदेच्या रस्त्यापासून ईडीच्या कार्यालयापर्यंत मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहेत. सोनिया गांधी आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात पोहोचतील आणि त्यांच्यासोबत राहुल गांधी असतील.

राहुल गांधी यांचीही जूनमध्ये चौकशी करण्यात आली होती. सोनिया यांची चौकशी होणार असल्याच्या विरोधात काँग्रेसने मोठ्या आंदोलनाची तयारी केली आहे. काँग्रेस खासदार संसदेच्या आत आणि बाहेर आंदोलन करतील. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या चौकशीपूर्वी प्रशासन सतर्क असून पोलिसांनी दिल्लीच्या अकबर रोडवर बॅरिकेडिंग करून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 

आधी ही बजावले होते समन्स 

ईडीकडून 23 जून रोजी सोनिया गांधी यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले होते. मात्र कोविड- 19 ची लागण आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. या कारणानं त्या चौकशीसाठी हजर राहू शकल्या नव्हत्या. आता सोनिया गांधी यांची तब्येत ठिक असल्यानं त्या चौकशीला हजर राहू शकणार आहेत.  तर याआधी सोनिया यांना 8 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे 23 जूनला समन्स बजावण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी