1996 सालचं 'ते' प्रकरण राज बब्बर यांच्या अंगाशी, MP-MLA कोर्टाचा मोठा निर्णय

बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) आणि काँग्रेस नेता राज बब्बर (Congress leader Raj Babbar) यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे.

Raj Babbar
राज बब्बर यांना 2 वर्षांची शिक्षा 
थोडं पण कामाचं
  • काँग्रेस नेते राज बब्बर यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
  • यासोबतच कोर्टाकडून त्यांना 8500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
  • एमपी एमएलए कोर्टानं हा निर्णय दिला आहे.

नवी दिल्ली:  बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor)  आणि काँग्रेस नेता राज बब्बर (Congress leader Raj Babbar)  यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. राज बब्बर यांनी एमपी एमएलए कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.  यासोबतच कोर्टाकडून त्यांना 8500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. काँग्रेस नेते राज बब्बर हे सरकारी कार्यात अडथळा आणणं आणि मारहाण प्रकरणात दोषी आढळून आले होते. 

काय आहे नेमकं प्रकरण 

लखनऊ येथील खासदार आमदार न्यायालयानं गुरुवारी बॉलिवूड अभिनेता आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांना 1996 च्या निवडणुकीत मतदान अधिकाऱ्याला मारहाण केल्याबद्दल दोषी ठरवलं आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. विशेष अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (MP/MLA) न्यायालयाचे विशेष अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी , अंबरिश कुमार श्रीवास्तव यांनी राज बब्बर यांला दोन वर्षांचा कारावास आणि 6500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात राज बब्बरसोबत आरोपी असलेले अरविंद सिंह यादव यांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा-  बंडखोर आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल, फोनवर धक्कादायक खुलासे; एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार?

2 मे 1996 मध्ये मतदान अधिकारी श्री कृष्ण सिंह राणा यांनी वजीरगंजमध्ये पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. राणा यांच्याकडून राज बब्बर आणि अरविंद सिंह यादव यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. राज बब्बर तेथून सपातून उमेदवार होते. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, राज बब्बर हे समर्थकांसह मतदान स्थळी घुसले आणि मतदान प्रक्रियेत अडथळा आणला. याशिवाय ड्यूटीवर असलेल्या लोकांशी चुकीच्या पद्धतीनं वागले. यादरम्यान श्रीकृष्ण सिंह राणा यांच्याशिवाय पोलिंग एजेंट शिव सिंह हे सुद्धा जखमी झाले होते.

राज बब्बर आणि त्याच्या साथीदारांकडून अधिकाऱ्यांना मारहाण

राज बब्बर आणि त्याच्या साथीदारांवर फिर्यादी आणि शिवकुमार सिंग यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान मतदान केंद्राच्या बूथ क्रमांक 191 वर नियुक्त मतदान अधिकारी मनोजकुमार श्रीवास्तव, व्ही के शुक्ला आणि पोलिसांनी त्यांची सुटका केली. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि राज बब्बर आणि अरविंद यादव यांच्याविरुद्ध पुरावे सापडले. त्यानंतर 23 सप्टेंबर 1996 रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. 

2020 रोजी राज बब्बरवरील आरोप निश्चित

आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर न्यायालयाकडून आरोपींना समन्स बजावण्यात आले. 7 मार्च 2020 रोजी राज बब्बर यांच्यावरील आरोप निश्चित केले गेले. फिर्यादीने फिर्यादी श्री कृष्णसिंह राणा, शिवकुमार सिंग, मनोज श्रीवास्तव, चंद्रदास साहू याशिवाय डॉ. एम.एस. कालरा यांना साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर केल होते. निकाल सुनावण्यात आला तेव्हा राज बब्बर देखील न्यायालयात उपस्थित होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी