Migrant Workers: घरी परतणाऱ्या मजुरांचे रेल्वे भाडे काँग्रेस देईल: सोनिया गांधी

लोकल ते ग्लोबल
Updated May 04, 2020 | 15:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

मजुरांचे रेल्वे प्रवासी भाडे काँग्रेसतर्फे दिले जाणार असल्याची घोषणा सोनिया गांधीनी केली आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका करत या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे.

Congress will pay the travelling rent of labours
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजूर प्रवाशांसाठी विशेष रेल्वे   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मजुरांचे रेल्वे प्रवासी भाडे काँग्रेसतर्फे दिल्या जाण्याची सोनिया गांधीची घोषणा
  • मजुरांच्या रेल्वे प्रवासी भाड्यावरुन केंद्र सरकारवर टीकास्त्र
  • केंद्र सरकारने या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे काँग्रेससह इतर पक्षांचे आवाहन

नवी दिल्ली: देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचविण्यासाठी श्रमिक विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेसच्या राष्ट्रीय हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मजुरांचे रेल्वेचे भाडे काँग्रेस देणार असल्याची घोषणा केली. मजूर हे आपल्या देशाचे कणा असल्याचेही त्यांनी म्हटले.  

मजुरांवर काँग्रेसची मेहरनजर 

मजुरांना मदत करण्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेसच्या हंगामी  अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले की, मजूर हे आपल्या देशातील अर्थव्यवस्थेच्या संरचनेचा कणा आहेत. वेगवेगळ्या कठीण परिस्थितीत त्यांनी हे सिध्द केले आहे. अशा या अवघड परिस्थीतीत सरकारला मजुरांबद्दल सहानभूतीने विचार केला पाहीजे. 

https://twitter.com/INCIndia/status/1257136615295762432

मजुरांच्या सद्य स्थितीवरुन केंद्र सरकारला केले प्रश्न

काँग्रेसकडून करण्यात आलेल्या घोषणेनंतर काँग्रेसने केंद्र सरकारला प्रश्न विचारले आहेत . काँग्रेसने म्हटले आहे की जर गुजरातमध्ये एका कार्यक्रमासाठीच्या वाहतूक आणि जेवन खर्चासाठी सरकार १०० कोटी रुपये खर्च करु शकते. त्या शिवाय रेल्वे मंत्रालय १५१ कोटीचा निधी पंतप्रधान कोरोना मदत निधीत देऊ शकते तर देशाच्या या कष्टकरी वर्गाला अडचणीच्या काळात मोफत रेल्वे सेवा का देऊ शकत नाही. 

कशामुळे काँग्रेस केंद्र सरकारला विरोध करत आहे

या सगळ्या घडामोडीत ही बाब जाणून घेणे अत्यंत आवश्यक होऊन जाते की काँग्रेस नेमका कोणत्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका करत आहे. सध्या विशेष श्रमीक रेल्वेद्वारे मजुरांना त्यांच्या गृहराज्यात पोहचविण्यास सुरुवात झाली आहे. मुद्दा मजुरांच्या रेल्वे भाडे कोण आणि कसे चुकविणार असा आहे. सद्यस्थितीत संबधीत राज्य सरकारे या रेल्वेने प्रवास करणाऱ्या मजुरांचे  प्रवासी भाडे देत आहे. परंतू नंतर हे प्रवासी भाडे त्यांच्याकडून वसूल केल्या जाणार आहे. याच मुद्द्याला काँग्रेसचा विरोध असल्याचे समजते आहे. काँग्रेससह इतरही राजकीय पक्षांचा हाच प्रश्न आहे. की सरकार विविध सार्वजनिक कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करु शकते तर मजुरांचे प्रवासी भाडे देण्यास काय अडचण आहे.      

https://i.timesnowhindi.com/Capture_rahul_0.JPG


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी