Online addiction : हा नादच वाईट रे बाबा! ऑनलाईन सट्ट्याने उद्ध्वस्त केलं एका पोलीस कॉन्स्टेबलचं आयुष्य

एखादं व्यसन व्यक्तीला कुठल्या थराला नेऊ शकतं, याचं उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. कॉन्स्टेबलची नोकरी करणाऱ्याला बेटिंगचं व्यसन जडलं आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.

Online addiction
ऑनलाईन सट्ट्याने बरबाद केलं पोलीस कॉन्स्टेबलचं आयुष्य  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कॉन्स्टेबलला लागली ऑनलाईन सट्ट्याची सवय
  • सट्टा खेळता खेळता झाला कर्जबाजारी
  • सायबर गुन्हेगारी प्रकरणात झाली अटक

Online Addiction : कुठलीही सवय (Habit) जेव्हा अतिरेकाकडं झुकते तेव्हा त्याचं व्यसनात (Addiction) रुपांतर व्हायला सुरुवात होते. त्या गोष्टीवर आपला ताबा (Control) राहत नाही आणि ती गोष्ट केल्याशिवाय चैनही पडत नाही, अशी अवस्था होते. दिल्लीमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलची अशीच अवस्था झाली. ऑलनाईन सट्टा (Online betting) खेळून झटपट श्रीमंत होण्याच्या त्याच्या लोभापायी त्याने लाखो रुपये बरबाद केलेे आणि अखेर गुन्हेगारीकडे (Crime) वळला. मात्र कुठलाही गुन्हेगार हा ज्याप्रमाणे कायद्याच्या कचाट्यात सापडतोच, तसा तोही सापडला. सर्व काही सुरळीत सुरू असताना केवळ एका व्यसनाने या कॉन्स्टेबलचं (police constable) आयुष्य कसं बरबाद केलं, याची कहाणी आता दिल्लीत चर्चिली जात आहे. 

अशी लागली सवय

दिल्ली पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला लागलेल्या रोहित दलाल (28) याला ऑनलाईन सट्टा खेळण्याची सवय लागली. सुरुवातीच्या काही प्रयत्नात पैसे मिळाल्यामुळे अशाच प्रकारे पैसे मिळवून झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग हाच आहे, असं त्याला वाटतं. त्यासाठी त्याने ऑनलाईन सट्टा खेळायला सुरुवात केली. आपल्या पगारातील सर्व पैसे तो सट्ट्यावर लावत होता आणि त्याचं सतत नुकसान होत होतं. वर्षानुवर्षं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी त्याने पुन्हा एकदा सट्टा खेळूनच पैसे मिळवायचं ठरवलं. त्यासाठी त्याने नातेवाईकांकडूनही पैसे उधार घेतले. हे पैसे त्याने सट्ट्यावर लावले आणि त्यातही तो हरला. त्यामुळे नातेवाईकांचं कर्ज त्याच्या डोक्यावर होतं. 

गुन्हेगारीकडे पावलं

पोलिसांत असूनही आपल्या डोक्यावरचं कर्ज फेडण्यासाठी त्याची पावलं सायबर गुन्हेगारीकडे वळायला सुरुवात झाली. त्याने वेगवेगळ्या प्रकारचे सायबर फ्रॉड करून पैसे कमावण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षी त्याला वाहतूक विभागानं कामावरून निलंबित केलं होतं. सतत सट्टा खेळण्याच्या विचारात असल्यामुळे त्याचं कामाकडे दुर्लक्ष होत होतं. त्यातून त्याने अनेक चुकाही करायला सुरुवात केली होती. 

अधिक वाचा - Breaking News 31 July 2022 Latest Update : Commonwealth Games 2022: वेटलिफ्टिंगमध्ये बिंदयाराणी देवीने पटकावलं रौप्य पदक

व्यापाऱ्याने केली तक्रार

निलंबित केल्यानंतरही रोहित हा पोलिसांचा युनिफॉर्म घालून व्यापाऱ्यांना धमकावण्याचं काम करत होता. दिल्लीजवळच्या मजनू का टिला परिसरात सायबर कॅफे चालवणाऱ्या राहुल कुमार यांच्याकडे तो गेला आणि त्यांना धमकावून 16 हजार रुपये फोन पे वरून ट्रान्सफर करायला सांगितले. पैसे दिले नाहीत, तर कायदेशीर प्रकरणात अडकवण्याची धमकीही त्याने दिली. त्यानंतर राहुल कुमार यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी पैसे ट्रान्सफर केल्याचे ऑनलाईन पुरावे तपासले आणि सायबर कॅफेतील सीसीटीव्ही फूटेज पुराव्याच्या आधारे रोहितवर गुन्हा दाखल केला. 

अधिक वाचा - Jammu Kashmir Encounter : जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांत उडाली चकमक; एक दहशतवादी ठार, दोन जवान जखमी

रोहितला हरयाणातून अटक

पैसे घेऊन हरयणात निघून गेलेल्या रोहितला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने केलेल्या सायबर गुन्ह्यांचा सध्या पोलीस तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी