Al-Qaeda Threat : पैगंबरवरील वादग्रस्त विधानाचा बदला घेणार अल-कायदा, पत्रकाद्वारे आत्मघाती हल्ल्याची धमकी; मुंबईसह 'या' राज्यांना इशारा

पैगंबरवरील (Prophet ) वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटू लागले असून दहशतवाद्यांनी (terrorists) भारतात हल्ला करण्याची धमकी दिली आहे. अल-कायदा (al-qaeda) या दहशतवादी संघटनेनं भारतात आत्मघाती हल्ले करण्याची धमकी दिली आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीत आत्मघाती हल्ले करण्यासाठी तयार असल्याची अधिकृत धमकी (Threaten) दिली आहे.

Al-Qaeda will retaliate against the Prophet's controversial statement
पैगंबरवरील वादग्रस्त विधानाचा बदला घेणार अल-कायदा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दिल्ली आणि मुंबईसह देशातील काही भागात आत्मघाती हल्ले करण्याची धमकी
  • आम्ही आमच्या पैगंबरांचा (Prophet Muhammad) अपमान करणार्‍यांचा खात्मा करू.- अल-कायदा
  • भगव्या दहशतवाद्यांनी आता दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आपल्या अंताची वाट पाहावी - अल-कायदा

Al-Qaeda Threat Letter :  नवी दिल्ली : पैगंबरवरील (Prophet ) वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटू लागले असून दहशतवाद्यांनी (terrorists) भारतात हल्ला करण्याची धमकी दिली आहे. अल-कायदा (al-qaeda) या दहशतवादी संघटनेनं भारतात आत्मघाती हल्ले करण्याची धमकी दिली आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीत आत्मघाती हल्ले करण्यासाठी तयार असल्याची अधिकृत धमकी (Threaten) दिली आहे. त्याचबरोबर भाजप लवकरच संपुष्टात येईल, असंही यात म्हटलं आहे. 

दहशतवादी संघटना अल-कायदाने (Al-Qaeda) एक पत्रक जारी करून दिल्ली आणि मुंबईसह देशातील काही भागात आत्मघाती हल्ले करण्याची धमकी दिली आहे. अल-कायदाने 6 जून रोजी हे धमकीचे पत्र जारी केले आहे. भाजपच्या काही नेत्यांनी मुहम्मद पैगंबर यांच्यावर टीका केल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र समोर आले आहे. अल-कायदाने म्हटलं की, काही दिवसांपूर्वी एका हिंदुत्व प्रचारकाने टीबीच्या चर्चेदरम्यान इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अल-कायदाने पुढे म्हटलं, 'आम्ही पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेऊ. आम्ही इतरांना या लढ्यात सहभागी होण्यास सांगू. 

“आम्ही आमच्या पैगंबरांचा (Prophet Muhammad) अपमान करणार्‍यांचा खात्मा करू आणि आमच्या प्रेषिताचा अपमान करणार्‍यांना उध्वस्त करण्यासाठी आम्ही आमच्या शरीरावर आणि आमच्या मुलांच्या शरीरावर स्फोटके बांधू. भगव्या दहशतवाद्यांनी आता दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आपल्या अंताची वाट पाहावी” असे या पत्रात म्हटले आहे. 

वादग्रस्त ट्वीट प्रकरणी भाजप युवा आघाडीच्या नेत्याला अटक

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हिंसाचार (Kanpur Violence) उसळल्यानंतर चार दिवसांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य (controversial statements) केल्याबद्दल कानपूर पोलिसांनी मंगळवारी भाजपच्या युवा आघाडीच्या नेत्याला अटक केली. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार कानपूर पोलिसांनी नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या युवा विंगचे नेते हर्षित श्रीवास्तव (Harshit Srivastava) यांना अटक केली आहे. 

नुपूर शर्माला महाराष्ट्र पोलिसांचे समन्स

प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्माला (Nupur Sharma) मंगळवारी महाराष्ट्र पोलिसांनी समन्स बजावले. तसेच त्यांना 22 जून रोजी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांनी निलंबित भाजप नेत्या नुपूर शर्मा यांना ईमेल तसेच स्पीड पोस्टद्वारे समन्स पाठवले असून त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याच्या तपशीलांचा उल्लेख केला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नुपूर शर्माला जिवे मारण्याच्या धमक्या

नुपूर शर्मांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली की त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आता दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुस्लीम राष्ट्रांनी केला निषेध 

अरबस्तानातील अनेक इस्लामिक देशांनी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजप प्रवक्त्यांच्या विधानावर आतापर्यंत 12 देशांनी आक्षेप घेतला आहे. ज्यामध्ये कतार, UAE, इराण, कुवैती, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, इंडोनेशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मालदीव यांचा समावेश आहे. भाजपकडूनही दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी