सुशील कुमार मोदींचे वादग्रस्त Tweet ट्विटरने हटवले!

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 26, 2020 | 12:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केलेले ट्विट ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणारे असल्याने ट्विटरने ते ट्विट हटविले आहे

Sushil Modi
सुशील कुमार मोदी  |  फोटो सौजन्य: Times of India

पटना: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केलेले ट्विट ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणारे असल्याने ट्विटरने ते ट्विट हटविले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक फोन नंबर सामायिक केला होता आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप केला होता की या नंबरवरून आरजेडीचे प्रमुख लालू यादव रांची कारागृहातून फोन करून एनडीएच्या आमदारांना आमिष दाखवत आहेत. हे ट्विट नियमांचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट करत ट्विटरने हे ट्विट काढून टाकले.

बिहारमधील नितीशकुमार सरकारला पाडण्यासाठी आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद एडीएच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप भाजप नेते सुशील मोदी यांनी मंगळवारी केला होता. माजी उपमुख्यमंत्र्यांनी ट्वीटद्वारे हा खळबळजनक आरोप केला आणि चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत असतानाही लालू प्रसाद या नंबरवर बोलू शकतात असा दावा करत मोबाईल नंबर शेअर केला. लालू रांचीतील एनडीएच्या आमदारांना दूरध्वनी करीत आहेत आणि मंत्रीपदाचे आश्वासन देत आहेत, असं मोदींनी ट्विट केलं होतं. ते म्हणाले की जेव्हा मी कॉल केला तेव्हा थेट लालूंनी फोन उचलला. मी म्हणालो तुरुंगातून असे घाणेरडे खेळ खेळू नका, तुम्हाला यश मिळणार नाही.

त्यानंतर लालूंच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली. ऑडिओमध्ये आमदार आपल्या पक्षाच्या विरोधात मतदान करताना त्यांच्या समस्या सांगत आहेत, त्यावर लालू म्हणतात की तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आपल्या पक्षाचा स्पीकर असेल. आपण हे सरकार पाडून आपले सरकार तयार होताच आम्ही आपल्याला बक्षीस देऊ. भाजपच्या आमदाराने या ऑडिओ क्लिपची पुष्टी केली आणि ते म्हणाले की सुशील कुमार मोदी यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली होती, जे राजद सुप्रीमो यांना कदाचित लक्षात आले नाही. भाजपचे आमदार ललन कुमार यांनी माध्यमांना सांगितले की 'मी जेव्हा सुशील मोदींसह बैठकीत होतो तेव्हा माझा सचिव माझ्याजवळ आला आणि त्याने मला सांगितले की लालू यांचा फोन त्याच्या मोबाईलवर आला आहे. मी आश्चर्यचकित झालो पण विचार केला की इतर बर्‍याच जनांसारखा विजयाचे अभिनंदन करण्यासाठी लालूंनी फोन केला असेल. फोनवर लालू सरकार पाडण्याविषयी बोलू लागले. मी त्यांना म्हणालो की मी पक्षाच्या शिस्तीशी बांधील आहे आणि हे संभाषण चालू असताना मी सुशील मोदींना याबद्दल सूचित केले.'

आपण आरजेडी सुप्रीमोला फोन केला आणि गलिच्छ पद्धतींचा अवलंब न करण्याचा इशारा दिला, असा दावा करत मोदींनी मंगळवारी रात्री ट्विट केले. विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी आपल्या पक्षाचे नेते विजय कुमार सिन्हा यांचे अभिनंदन केले आणि म्हणाले की लालू प्रसाद यांचे षडयंत्र अयशस्वी झाले. राजद प्रमुख चारा घोटाळ्याच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी