Veer Savarkar Photo : शिवमोग्गा : कर्नाटकातील शिवमोग्गामध्ये वीर सावरकरांच्या फोटोवरून वाद निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर सावरकरांचा फोटो लावला होता, तेव्हा काही मुस्लिम तरुणांनी विरोध केला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या भागात कर्फ्यु लावला आहे. सावरकरांचा फोटो काढण्यावरून हिंदू संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे.
अधिक वाचा : Independence Day 2022 : भारताप्रमाणेच15 ऑगस्टला स्वतंत्र झाले हे पाच देश, वाचा सविस्तर
Karnataka Police arrests 3 for vandalising Tipu Sultan posters put up by Congress — ANI Digital (@ani_digital) August 15, 2022
Read @ANI Story | https://t.co/c13JzPfZTf#Karnataka #Congress #TipuSultan pic.twitter.com/csK9nK5RiT
मंगळुरूच्या सुरातकल भागात वीर सावरकर यांचा फोटो लावण्यावरून बाद झाला. त्यानंटर सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या फोटोंवर आक्षेप घेतला. त्यानंतर या फ्लेक्सवरून सावरकरांची प्रतिमा हटवण्यात आली. इथे एका चौकाला सावरकरांचे नाव देण्यात आले होते. मंगळुरू महानगर पालिकेने या निर्णयाला मंजूरीही दिली होती. भाजप आमदार वाई भारत शेट्टी यांनी या चौकाला सावरकर यांचे नाव द्यावे अशी मागणी केली होती.
Tension in #Shivmoga, #Karnataka over savarkar poster, curfew imposed #savarkar #curfew #poster pic.twitter.com/AEyPHKXRKb — Himanshu dixit (@HimanshuDixitt) August 15, 2022
सोशल डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की ही भागात अतिशय संवेदनशील आहे, म्हणून इथे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. या चौकाला सावरकरांचे नाव देण्यास विरोध केल्याचे या नेत्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत कर्नाटकात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
अधिक वाचा : VIDEO : जमिनीपासून ३० किमी उंचीवर आकाशात फडकला तिरंगा
कर्नाटकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांसोबत टिपू सुलतानचाही फोटो लावला होता. त्यानंतर काँग्रेस नेते डीके शिवकुमार घटनास्थळी पोहोचले, शिवकुमार यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर टीका केली आणि भाजपने स्वांतंत्र्यसैनिकांसोबत नेहरुंचा फोटो हटवल्याचे सांगितले. शिवकुमार यांनी एकामागून एक ट्विट करून भाजपवर टीकास्त्र सोडले.
अधिक वाचा : Independence day 2022 : पेट्रोल 25 पैसे, सोनं 88 रुपये! 1947 साली असे होते वस्तूंचे दर