Coolie Become IAS : सामान्य जीवन जगणाऱ्या Coolie ला स्टेशनवरील Wifi नं बनवलं IAS अधिकारी, वाचा श्रीनाथच्या जबदरस्त प्रवासाची कहाणी

आपण ही शहरातील इतर सामान्य लोकांसारखं आपले जीवन असावे, असं म्हणत श्रीनाथनं आपलं आय़ुष्याला कलाटणी दिली. प्रवाशांच्या वस्तूच्या बोझा डोक्यावर घेत घेत श्रीनाथने आपल्या डोक्यात ज्ञान टाकून- टाकून आयएएस अधिकारी पद गाठलं. श्रीनाथच्या या यशात सर्वात मोठा भागीदार ठरला तो म्हणजे रेल्वे स्टेशनवरील (Train station) Wifi.

Coolie Become IAS
जिद्द असावी तर श्रीनाथ सारखी; Coolie ते IAS वाचा पूर्ण काहणी  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • श्रीनाथ हे केरळच्या मुन्नारमध्ये राहत.
  • केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी श्रीनाथ यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
  • रेल्वे स्टेशनच्या Wifi च्या मदतीने ऑनलाईन अभ्यास करुन श्रीनाथ बनले आयएएस अधिकारी.

IAS's Success Story : नवी दिल्ली : आपण ही शहरातील इतर सामान्य लोकांसारखं आपले जीवन असावे, असं म्हणत श्रीनाथनं आपलं आय़ुष्याला कलाटणी दिली. प्रवाशांच्या वस्तूच्या बोझा डोक्यावर घेत घेत श्रीनाथने आपल्या डोक्यात ज्ञान टाकून- टाकून आयएएस अधिकारी पद गाठलं. श्रीनाथच्या या यशात सर्वात मोठा भागीदार ठरला तो म्हणजे रेल्वे स्टेशनवरील (Train station) Wifi. श्रीनाथचही कहाणी ऐकल्यानंतर स्वत: केंद्रीय मंत्री पीयुष गोयल  (Union Minister Piyush Goyal) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. आज या लेखात आपण स्वप्न कशी पुर्ण केली जातात यांचे उदाहरण मांडणाऱ्या श्रीनाथला भेटणार आहोत... 

केरळच्या (Kerala) इडिकी जिल्ह्यातील मुन्नारमध्ये राहणारे श्रीनाथ हे एक सामान्य जीवन जगत होते. श्रीनाथ के यांच्या घरापासून १४० किलोमीटर दूर अंतरावरील कोचिन रेल्वेस्टेशनवर ते कुलीचं काम करत. रोज प्रवाशांची वस्तू आपल्या डोक्यावर घेऊन त्यांना रेल्वे पर्यंत पोहचवण्याचं काम करतं. परंतु मनाशी बाळगलेल्या एका जिद्दामुळे श्रीनाथ हे एक क्लास वन अधिकारी बनले आहेत. शहरातील इतर सुखी लोकांसारखं आपणही जगावं असं म्हणत त्यांनी परत शिक्षणाचा विचार केला. आपल्या यशातून हे सिद्ध केलं की,  परिस्थिती कशीही असो, वेळ किती मिळत असला तरी, तुम्ही जर निश्चय केला तर यशाच्या शिखरावर पोहचू शकतात हे श्रीनाथने पटवून दिलं आहे. 

दुसऱ्यांसाठी बनले आदर्श श्रीनाथ 

UPSC परीक्षा उत्तीर्ण करणे सोपे काम नाही. दरवर्षी लाखो इच्छुक या परीक्षेला बसतात. परंतु त्यापैकी फक्त काही नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होतात आणि IAS, IPS आणि IFS अधिकारी बनतात.  श्रीनाथ के. पण असेच एक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांपैकी आहेत. ज्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आणि  आयएएस होण्यासाठी जीवाची बाजी लावली. या परीक्षांमध्ये यश मिळवत त्यांनी लाखो विद्यार्थ्यांना सांगितले की, तुमची इच्छा असेल तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत मार्ग शोधून यशाकडे वाटचाल करू शकता.

coolie

काय आहे श्रीनाथाची कथा?

श्रीनाथच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे तो एर्नाकुलम स्टेशनवर पोर्टर (कुली) म्हणून काम करू लागला. तथापि, 2018 मध्ये, त्यांनी ठरवले की तो कठोर परिश्रम करेल आणि चांगली नोकरी मिळवेल, ज्यामुळे त्याचे उत्पन्न तर वाढेल, शिवाय त्याला आपल्या मुलीचे भविष्य घडविण्यात मदत होईल. सुरुवातीला त्यांनी नागरी सेवा परीक्षा देण्याचे ठरवले. मात्र आर्थिक परिस्थिती त्यांच्या मार्गात अडथळा ठरली. कारण परिस्थिती हालाकीची असल्यने ते कोचिंग सेंटरची फी भरू शकत नव्हते. 

kerala

चौथ्या प्रयत्नात आय.ए.एस

अशा परिस्थितीत त्यांनी KPSC (केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशन) च्या परीक्षेची तयारी केली, ज्यामध्ये रेल्वे स्थानकावर लावलेल्या मोफत वायफायने त्यांना खूप मदत केली. श्रीनाथने स्टेशनच्या वायफायवरून स्मार्टफोनवरुन अभ्यास सुरू केला. फावल्या वेळात ते ऑनलाइन लेक्चर्स डाऊनलोड करायचे आणि कानात हेडफोन लावून ते कामाच्या वेळीही ऐकायचे. आपल्या जिद्दीच्या जोरावर ते केपीएससी परीक्षेत यशस्वी झाले. पण श्रीनाथचे ध्येय त्यापेक्षा मोठे होते. त्यामुळे काही काळानंतर त्याने आयएएसची तयारी केली आणि चौथ्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. 

kerala

जेव्हा यशोगाथा व्हायरल झाली

श्रीनाथ यांची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयुष गोयल यांनी एक व्हिडिओ शेअर केला. श्रीनाथ यांनी मिळलेल्या यशाबद्दल गोयल यांनी कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी