कोरोना 2.0 जितक्या वेगाने वाढत आहे तितक्याच वेगाने संपुष्टात येणार, क्रेडिट सुसेच्या अभ्यासात दावा

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 17, 2021 | 10:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

क्रेडिट सुसेच्या एका अभ्यासानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जितक्या वेगाने लोकांना संसर्ग होत आहे तितक्याच वेगाने ही लाट मागे सरेल. एप्रिलच्या अखेरपर्यंत देशातील 40 टक्के लोकांमध्ये प्रतिजैविके विकसित होतील.

Corona virus
कोरोना 2.0 जितक्या वेगाने वाढत आहे तितक्याच वेगाने संपुष्टात येणार, क्रेडिट सुसेच्या अभ्यासात दावा 

थोडं पण कामाचं

  • डिसेंबर अखेरपर्यंत 21 टक्के लोकांमध्ये प्रतिजैविकांचा विकास
  • एप्रिल अखेरपर्यंत 13 टक्के लोक घेतील लसीची पाहिली मात्रा
  • भारतात जूनपर्यंत दररोज होतील 2,320 मृत्यू

नवी दिल्ली: भारतात (India) कोरोनाची (corona) दुसरी लाट (second wave) जितक्या वेगाने पसरत आहे तितक्याच वेगाने संपुष्टातही येईल. क्रेडिट सुसेच्या एका अभ्यासात (study) असा दावा (claim) केला गेला आहे की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जितक्या वेगाने लोकांना संसर्ग (infection) होत आहे तितक्याच वेगाने ही लाट मागे सरेल. या अध्ययनातून असे अनुमान (conclusion) काढण्यात आले आहे की एप्रिलच्या अखेरपर्यंत देशातील 40 टक्के लोकांमध्ये प्रतिजैविके (antibodies) विकसित होतील.

डिसेंबर अखेरपर्यंत 21 टक्के लोकांमध्ये प्रतिजैविकांचा विकास

या अध्ययनात असे सांगितले गेले आहे की डिसेंबरच्या अखेरपर्यंत 21 टक्के लोकसंख्येत अँटीबॉडी म्हणजे प्रतिजैविके विकसित झाली होती. एप्रिलच्या अखेरपर्यंत यात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय लसीकरणाद्वारे 12 टक्के लोकांमध्येही प्रतिरोधक क्षमता विकसित केली जाईल. अशा प्रकारे 40 टक्के लोक हे कोरोनामुळे मृत्युमुखी पडण्याच्या धोक्याच्या बाहेर येतील. इतकेच नाही, तर 28 टक्के लोकसंख्येत संक्रमणाद्वारे प्रतिरोधक क्षमता विकसित होईल.

एप्रिल अखेरपर्यंत 13 टक्के लोक घेतील लसीची पाहिली मात्रा

या अध्ययनात व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत कमीत कमी 13 टक्के लोक हे कोरोनाविरोधक लसीची पहिली मात्रा घेतील. या अभ्यासातून पुढे आलेल्या निष्कर्षांनुसार कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये 87 टक्के लोक हे 50 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत.

भारतात जूनपर्यंत दररोज होतील 2,320 मृत्यू

लॅसेंट कोव्हिड-19 आयोगाने म्हटले आहे की भारतात जर कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलली गेली नाहीत तर जून 2021च्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशात दररोज 1750 ते 2320 मृत्यू होतील. आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे की महाराष्ट्र, छत्तीसगढ, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरातवर सर्वात जास्त परिणाम होईल. सध्या भारतावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रचंड प्रादुर्भाव दिसून येत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जिथे दररोज 11,000 नवबाधित आढळत होते तिथे 10 एप्रिल रोजी 1,52,565 नवबाधित आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी