Corona Cases in UK: ब्रिटन: कोरोनाची दुसरी लाट (second wave of corona) ओसरल्यानंतर जगाने सुटकेचा श्वास सोडला, परंतु तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याचं आरोग्य (Health) संघटनेकडून नेहमी सांगितलं गेलं. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रॉनचा (Omicron) प्रसार यामुळे तिसरी लाट (Third Wave) येण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तेब होताना दिसत आहे. ब्रिटन (United Kingdom)मध्ये परत एकदा कोरोनाने आपला विक्राळ रुप घेतलं आहे. ब्रिटनमध्ये बुधवारी पूर्ण झालेल्या 24 तासात तब्बल 106,122 नवीन कोरोना सक्रीय रुग्ण आढळले आहेत.
पहिल्यांदा दैनिक आकडा हा एक लाखाच्या पुढे गेला आहे. येथे ओमायक्रॉन व्हेरिएंट जोरात पसरू लागला आहे. यापूर्वी सोमवारी ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे 91741 रुग्ण आढळले होते, तर लोकांच्या संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर 28 दिवसांत 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ झाल्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान युरोपियन देशांमध्ये ब्रिटन कोरोनाच्या व्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित झालेला देश आहे. येथे कोरोना महामारी सुरू झाल्यापासून, कोविड-19 मुळे आतापर्यंत 147,573 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 11 दशलक्ष लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटन सरकार देशातील नागरिकांना कोरोनाचा तिसरा बुस्टर डोस घेण्याचं आव्हान करत आहे. येथे आतापर्यंत 30 दशलक्षाहून अधिक लोकांनी येथे बूस्टर डोस घेतला आहे. त्याच वेळी, ब्रिटनमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनच्या 37,101 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. दरम्यान, ब्रिटीश सरकारने बुधवारी पाच ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझरची कोविड-19 लस मंजुरी दिली आहे.
त्याच वेळी, ब्रिटीश सरकारने बुधवारी सांगितले की, कोरोना विषाणूच्या नवीन प्रकार, ओमिक्रॉनशी लढण्यासाठी आणखी लाखो अँटीव्हायरस खरेदी करण्यात आले आहे. यासाठी दोन नवीन करार करण्यात आल्याचे सरकारने सांगितले. नवीन करारांतर्गत, हे अँटीव्हायरस पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून उपलब्ध होतील आणि ओमिक्रॉनच्या विरूद्ध अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे. युकेचे आरोग्य मंत्री साजिद जाविद म्हणाले: "आमचा कोविड-19 बूस्टर कार्यक्रम प्रचंड वेगाने चालू आहे आणि जगातील सर्वोत्कृष्ट उपचारांमध्ये प्रवेश सुनिश्चित करून आम्ही विषाणूला आपला राष्ट्रीय प्रतिसाद अधिक मजबूत करणे अत्यावश्यक आहे."दरम्यान, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने चेतावणी जारी केली की, Omicron प्रकारामुळे युरोप खंडात कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते. ओमिक्रॉनचे लाट येथे पुन्हा येऊ शकते, त्यामुळे त्यासाठी सज्ज राहा, असेही सांगितले.
कोविड१९ हा कोरोना विषाणू आणि त्याचा ओमायक्रॉन नावाचा नवा अवतार या दोन्ही विषाणूंमुळे कोरोना संकट वेगाने पसरत आहे. आवश्यक ती खबरदारी घेतली नाही तर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाईल; असा स्पष्ट इशारा चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिला आहे. नागरिकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि लॉकडाऊन संपेपर्यंत घरात राहा; असा सल्लावजा आदेश प्रशासनाने दिला आहे. प्रशासनाच्या नियमानुसार लॉकडाऊन काळात प्रत्येक घरातून फक्त एकच व्यक्ती घराबाहेर पडून गरजेच्या वस्तूंची खरेदी करू शकते. इतरांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे.