कोरोना महामारी अन् लॉकडाऊननं वाढवला बाल मजुरांचा आकडा: क्रायचा अहवाल

कोरोना महामारीमुळे आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. शहरात मजुरी करणाऱ्यांना आपला सर्व संसार गुंडाळून परत गावी यावे लागलं होतं. या काळात सर्वाधिक नुकसान हे लहान मुलांचे झाले आहे, त्यांच्यापासून शिक्षण दूर गेलेच शिवाय त्यांना बालकामगार म्हणूनही काम करावे लागत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांच्या शिक्षणावर आरोग्यावर खोलवर परिणाम झाला आहे. 

Increase in the number of child laborers due to drop out of education
महामारीत शिक्षण सुटल्यानं बाल कामगाराच्या संख्येत वाढ  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई  :  कोरोना महामारीमुळे आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. शहरात मजुरी करणाऱ्यांना आपला सर्व संसार गुंडाळून परत गावी यावे लागलं होतं. या काळात सर्वाधिक नुकसान हे लहान मुलांचे झाले आहे, त्यांच्यापासून शिक्षण दूर गेलेच शिवाय त्यांना बालकामगार म्हणूनही काम करावे लागत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांच्या शिक्षणावर आरोग्यावर खोलवर परिणाम झाला आहे.  बाल हक्क स्वयंसेवी संस्था, बाल हक्क आणि क्राय या सेवाभावी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार या काळात शेती तसेच इतर उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मुलांचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे दिसत आहे. हे प्रमाण ग्रामीण  भागात लक्षणीय असून मुंबईसारख्या शहरी भागातही बालमजूर 8 ते 12 तास काम करत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

क्राय या सेवाभावी संस्थेने राज्याच्या जालना, अहमदनगर, लातूर, वर्धा, नंदुरबार, परभणी या सहा जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार तेथील बाल कामगाराचा एकूण आकडा 2020 मध्ये 2 हजार 556 वरुन 2021 मध्ये तीन हजार 356 वर गेला आहे. सध्या हा आकाडा 3 हजार 309 वर आहे. शाळा बंद होणे, ऑनलाइन वर्गांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हीटी आणि मोबाईल फोनचा अभाव, नोकरी गमावल्यामुळे कुटुंबावर आर्थिक ताण तसेच सरकारी बस सेवेच्या प्रदीर्घ संपामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक नुकसान झाले आहे. या प्रकारचे निरीक्षण या संस्थेचे संचालक क्रियान रबाडी यांनी नोंदविले आहे. 

घरकामाचा भार वाढला

ग्रामीण भागातील परिस्थितीप्रमाणे शहरी भागातील परिस्थितीही फार वेगळी नाही. सर्वेक्षणादरम्यान वांद्रेच्या राहुल नगर, सायन कोळीवाडा आणि मानखुर्दाच्या चित्ता कॅम्पमध्ये 14 ते 18 वर्ष वयोगटातील 589 मुलांपैकी 145 मुले सध्या वेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये गुंतलेली असून त्यापैकी 84 मुली घरातील कामे करत आहेत. दरम्यान सर्वेक्षणात प्रतिसाद दिलेल्या 84 टक्के लोकांमधील 64 टक्के लोकांना आर्थिक परिस्थिती व पैशाआभावी मुलांना कामे करण्यासाठी पाठवावे लागत आहे. यामुळे 35 टक्के लोकांनी वाढते बाल कामगार हा चिंतेचा विषय असल्याचे मत नोंदविले आहे. 

सर्वेक्षणातील काही निरीक्षणे

  • शाळेतील पुस्तके आणि जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी या मिळकतींचा उपयोग होत असला तरीही चिंताजनक बाब म्हणजे काही मुले आपल्या कमाईतील काही पैसा नशेवर खर्च करतात. 

आर्थिक परिस्थितीचा भार - 

शंभर ते 500 रुपयांसाठी मुलांनी शाळेत जाण्याऐवजी काम करणे पसंत केले आहे. 

कामानिमित्त शेजारच्या शहरात मुलांचे स्थलांतर

 मुंबई, पुणे, दौंड, बीड, मनमाड, औरंगाबाद, नाशिक, या शहरांमध्ये घर कामगार, भिकारी, मजूर म्हणून कामे करतात. तर ही मुले अनेकदा वाढपी किंवा वीटभट्टीवर मजुरीचे काम करतात. ऊस तोडणी, सिंचन, शेतजमिनीची मशागत, पेरणी, लागवड, आंतरपीक,मळणी आदी कामांसाठी स्थलांतर करत असतात. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी