Corona is Back : चीन-अमेरिकेत Corona वाढल्याने भारत अलर्टवर; केंद्राकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी, बैठका सुरू

Corona is Back: लंडनस्थित ग्लोबल हेल्थ इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्स फर्मने (global health intelligence and analytics firm) एक भीतीदायक आकडेवारी सादर केली आहे. या फर्मच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये अत्यंत कमी लसीकरण आणि बूस्टर डोस तसंच हायब्रिड प्रतिकारशक्तीचा अभाव पाहता, बीजिंगने आपली झिरो-कोविड पॉलिसी हटविल्यास 13 ते 21 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

India on alert due to increase in Corona in China-America
Corona is Back :सावधान कोरोना परत येऊ शकतो; सरकार सतर्क   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
  • परिस्थिती पाहता नवे निर्बंध लागू होण्याबाबत निर्णय होऊ शकतो.
  • चीन, अमेरिका, जपान, ब्राझील, कोरियात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

Center issues guidelines to states : तब्बल दोन वर्ष कोरोनाचं (Corona)महाभंयकर    संकट  अनुभवल्यानंतर  आता कुठे आपण सर्वजण मोकळा श्वास घेतोय. अशातच चीन (China) आणि अमेरिकेतून (America) धोक्याची घंटा वाजू लागली आहे. चीनमध्ये परिस्थिती पुरती हाताबाहेर गेली आहे. चीनमध्ये 20 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लंडनस्थित ग्लोबल हेल्थ इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्स फर्मने (global health intelligence and analytics firm) एक भीतीदायक आकडेवारी सादर केली आहे. या फर्मच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये अत्यंत कमी लसीकरण आणि बूस्टर डोस तसंच हायब्रिड प्रतिकारशक्तीचा अभाव पाहता, बीजिंगने आपली झिरो-कोविड पॉलिसी हटविल्यास 13 ते 21 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.(Corona is Back: India on alert due to increase in Corona in China-America; Center issues guidelines to states)

अधिक वाचा  : फडणवीसांनी करून दाखवलं - अण्णा हजारे

दरम्यान कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी NCDC आणि ICMR ला पाठवलं पत्र पाठवले आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्रा सरकारने राज्य सरकारला दिलेल्या ऍडव्हायजरीनुसार चीन, अमेरिका, जपान, ब्राझील, कोरियात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व राज्यांनी कोरोना स्थितीवर लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. जिनोम सिक्वेन्सिंगवर लक्ष केंद्रित करा असेही यामध्ये सांगण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतही सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  :  अहो दादा जाणून घ्या! कोण बनला तुमच्या गावचा सरपंच

देशात पुन्हा कोरोना निर्बंध लागण्याची शक्यता 

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी देशातील कोविड-19 परिस्थितीबाबत वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. एएनआय वृत्तसंस्थेना दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक 11:30 वाजता सुरू होईल. या बैठकीमध्ये इतर देशांतील कोविड 19 परिस्थितींचाही आढावा घेण्यात येईल. यानंतर परिस्थिती पाहता नवे निर्बंध लागू होण्याबाबत निर्णय होऊ शकतो.

ओमायक्रॉनचे नवे 2 व्हेरिएंट

चीनच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रोच्या 2 नव्या सब व्हेरिएंटमुळे चीनमध्ये थैमान घातले आहे. चीनच्या अनेक शहरातील रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचे बीए.5.2  आणि बीएफ.7 हे सब व्हेरिएंट आढळले आहेत. या दोन व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

अधिक वाचा  : Gram Panchayat Election Results: ग्रामपंचायत निवडणूक निकाल

बीजिंगमध्ये BF.7 व्हेरिएंटचा उद्रेक

चीनची राजधानी बीजिंगमध्ये (Coronavirus in Beijing) ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BF.7 (Omicron Subvariant BF.7) ने कहर केला आहे. अनेक रुग्णांमध्ये या व्हेरिएंटची लक्षणे आढळली आहेत. यामुळे बीजिंगमधील आरोग्य व्यवस्था पुरती ढासळली असून रुग्णालयाबाहेर उपचारासाठी रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.

चीनमध्ये तीन महिन्यात तीन लाटा

चीनचे तज्ज्ञ वू जुन्यो यांनी पुढच्या तीन महिन्यात कोरोनाच्या तीन लाटा येण्याची भीती व्यक्त केली आहे. चीन सध्या पहिल्या लाटेचा सामना करत आहे. 15 जानेवारीच्या आसपास कोरोनाचा कहर आणखी वाढू शकतो. 21 जानेवारीला चीनचा लूनार न्यू इयरला सुरुवात होत आहे, यावेळी लोकं मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतील. यानंतर दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाटेची शक्यात तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

 तरीही आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरूच 

या काळात चीनच्या 60 टक्क्यांहून जास्त नागरिकांना कोरोनाची बाधा झालेली असेल. असे असले तरी सरकारने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे केवळ सुरूच ठेवली नाही तर त्यांची संख्याही वाढवली आहे. झीरो कोविड धोरणात चीनमध्ये दररोज 100 आंतरराष्ट्रीय उड्डाणे होती. ती संख्या आता 2 हजारांवर गेली. त्यामुळे इतर देशांच्या चिंतेत भर पडली आहे. चीनमध्ये सध्या 7,290  देशांतर्गत उड्डाणे सुरू आहेत. हे प्रमाण गेल्या आठवड्याच्या 158 टक्के जास्त आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी