कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्ही हे तिन्ही आजार एकाचवेळी झाले, उपचार सुरू

corona monkeypox and hiv positive man : जगातला पहिला दुर्मिळ रुग्ण आढळला आहे. या रुग्णाला एकाचवेळी कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्ही या तिन्ही आजारांची बाधा झाली आहे.

corona monkeypox and hiv positive man
कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्ही हे तिन्ही आजार एकाचवेळी झाले, उपचार सुरू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्ही हे तिन्ही आजार एकाचवेळी झाले
  • जगातला पहिला दुर्मिळ रुग्ण
  • उपचार सुरू

corona monkeypox and hiv positive man : जगातला पहिला दुर्मिळ रुग्ण आढळला आहे. या रुग्णाला एकाचवेळी कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्ही या तिन्ही आजारांची बाधा झाली आहे. घसादुखी, घसा खवखवणे, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, अंगाची आग होणे अशा स्वरुपाची लक्षणे या रुग्णात आधी आढळून आली. नंतर त्याची तब्येत बिघडली.

विना कपडे या ठिकाणी बिनधास्त साजरा करा हनीमून

जान्हवीप्रमाणेच खुशी कपूरही आहे बोल्ड, पहा फोटो

एकाचवेळी कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्ही हे तिन्ही आजार झालेल्या दुर्मिळ रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत. 'जर्नल ऑफ इन्फेक्शन'मध्ये या रुग्णाविषयी माहिती प्रसिद्ध झाली आहे. रुग्णाचे नाव 'जर्नल ऑफ इन्फेक्शन'ने गुप्त ठेवले आहे. 

ऋषभ पंतच्या बहिणीची आयपीएल स्टारसोबत लंडनमध्ये धमालमस्ती

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने कोणाला केलं बर्थडे विश, म्हणाली- I Love u

ज्याला एकाचवेळी कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्ही हे तिन्ही आजार झाले आहेत तो रुग्ण आजारी पडण्याआधी स्पेनला गेला होता. स्पेन येथून पाच दिवसांचा दौरा करून परतल्यानंतर नऊ दिवसांनी या व्यक्तीची तब्येत बिघडली आणि त्याला तीन आजारांची बाधा झाल्याचे लक्षात आले. लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली आणि तीन दिवसांनी रुग्णाला कोरोना झाल्याचे लक्षात आले. त्याच्या शरीरावर लाल रंगाचे फोड दिसू लागले. आणखी तपासणी झाली. यानंतर त्याला ओमिक्रॉन BA.5.1 या कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे लक्षात आले. 

एकाचवेळी तीन आजार झालेल्या दुर्मिळ रुग्णाने स्पेनल जाण्याआधी फायझर कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस घेतले होते. पण रुग्णाला एकदम कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्हीची बाधा झाला. तातडीने उपचार सुरू केल्यामुळे संबंधित रुग्णाची तब्येत सावरत आहे. रुग्ण कोरोना आणि मंकीपॉक्स या दोन आजारांतून सावरत आहे. एचआयव्हीवर लवकरच उपचार सुरू होणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी