बापरे... देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढले, एवढी झाली संख्या 

कोरोनाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. भारतातही रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आता प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे. 

corona patients have increased 886 patients across in the country
बापरे... देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढले, एवढी झाली संख्या  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: भारतात कोरोना बाधित रुग्णांमध्ये सतत वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. आतापर्यंत देशभरात एकूण ८८६ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात आतापर्यंत ७९ जण बरे झाले आहेत. तर आतपर्यंत १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज देशात लॉकडाऊनचा चौथा दिवस आहे. सध्या जगभरात कोरोनाचे ६ लाखाहून अधिक रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण मृतांची संख्या २७,००० पेक्षा जास्त झाली आहे. 

सध्या अमेरिकेत सर्वाधिक १,०५,००० पेक्षा अधिक रुग्ण असल्याचे समोर आले आहेत. तर अमेरिकेत आतापर्यंत १६०० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, इटलीमध्ये ८६,००० पेक्षा जास्त रुग्ण असल्याचं समोर आलं आहे.  परंतु येथे मृतांचा आकडा सर्वात जास्त आहे. कारण, इटलीमध्ये ९१०० पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या आकडेवारीच्या बाबतीत स्पेन दुसर्‍या क्रमांकावर आहे. येथे आतापर्यंत ७९०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जवळपास संपूर्ण जग या कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे यातून नेमकं कसं बाहेर पडायचं यासाठी सारं जग आज प्रयत्न करत आहे. 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत अशी माहिती दिली की, भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे एकूण ८८६ रुग्ण झाले आहेत. 

दरम्यान, देशाच्या अनेक भागातून गरीब मजूर हे आता  आपापल्या गावी जाऊ लागले आहेत. यासाठी त्यांना बरीच पायपीट करावी लागत आहे.  लॉकडाऊनमुळे त्यांच्या राहण्याची व खाण्याची व्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. त्यामुळेच हजारो लोक घरी परतण्यासाठी पायपीट करत आहेत.

जगात सर्वाधिक मृत्यू संख्या असलेले देश 

 1. इटली - ९१००

 2. स्पेन -  ७९००

 3. चीन - ३२९२

 4. इराण - २२७८

 5. फ्रान्स - १६९६

 6. अमेरिका - १३०४

 7. ब्रिटन - ५७८

 8. नेदरलँड - ४३४

 9. बेल्जियम - २२९

 10. जर्मनी - २८१  

जगाची आकडेवारीवर नजर 

 1. भारत - ८८६ 

 2. कोरोना बाधित - ५,४२,५३३ 

 3. मृत्यू -२४ हजार ३६९

 4. बरे झालेले रुग्ण -  १,२८,६२०

 5. सध्या बाधित संख्या -  ३७४, ६७३

 6. अती गंभीर परिस्थितीतील रुग्ण -  २० हजार ९७१

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी