Corona Update : एका दिवसांत आढळले 54,286 नवे रुग्ण; 5 राज्यांतील सक्रिय रुग्णांचा आकडा 50 हजारांवर

देशात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 54 हजार 286 कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे.

54,286 new patients found in one day
एका दिवसांत आढळले 54,286 नवे रुग्ण  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • पाच राज्यातील रुग्णांचा आकडा 50 हजारांवर
  • सक्रिय रुग्णांच्या संख्येत 16 हजार 183 ने घट
  • गेल्या 24 तासात 69 हजार 130 लोक उपचार घेत बरे झाले

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 54 हजार 286 कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे. यामध्ये 69 हजार 130 लोक उपचार घेत बरे झाले तर 1 हजार 323 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीतदेखील दिवसेंदिवस घट पाहायला मिळत आहे. काल बुधवारी देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत 16 हजार 183 ने घट झाली. मात्र देशात डेल्टाचं संकट आलं असून देशभरातील राज्यात याचे रुग्ण आढळून येत आहेत. 

देशातील अनेक राज्यांत सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होत आहे. परंतु, देशात अजूनही 5 राज्ये असे आहेत, जेथे सक्रिय रुग्णांचा आकडा 50 हजारांवर आहे. यामध्ये महाराष्ट्र (1.21), कर्नाटक (1.16), केरळ (99,389), तमिलनाडु (52,884) और आंध्र प्रदेश (51,204) राज्यांचा समावेश आहे.

देशात कोरोना स्थिती

मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 54,286
मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 69,130
मागील 24 तासात एकूण मृत्यू : 1,323
आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्ण : 3 कोटी
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण : 2.90 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू : 3.92 लाख
सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 6.21 लाख

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी