कोरोनापासून बचावासाठी घरातच बनवले आयसीयू, सेटअपसाठी किती येतो खर्च, जाणून घ्या

लोकल ते ग्लोबल
Updated May 04, 2021 | 15:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

काही लोकांनी स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबला आहे. काही लोकांनी स्वत:च्या घरालाच मिनी हॉस्पिटल बनवले आहे.

Setting up ICU facility at home
कोरोना काळात घरातच बनवले आयसीयू 

थोडं पण कामाचं

  • कोरोनासाठी घरातच आयसीयू
  • आयसीयू सेटअपचा खर्च
  • वैद्यकीय तज्ज्ञांची सेवा

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभर अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे. कोरोनाच्या संकटापासून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी लोक प्रचंड प्रयत्न करत आहेत. कोरोनच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक सुविधांचा तुटवडा निर्माण होतो आहे. काही रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, तर काहींना ऑक्सिजनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागते आहे. अशामध्ये काही लोकांनी स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबला आहे. काही लोकांनी स्वत:च्या घरालाच मिनी हॉस्पिटल बनवले आहे. व्हेंटिलरपासून ते दुसऱ्या वैद्यकीय उपकरणांपर्यत सर्व सेटसप ते आपल्या घरातच लावत आहेत.

घरातच आयसीयू सेटअप उभा करण्यासाठी जवळपास २.५ लाख ते ३ लाख रुपयांपर्यतचा खर्च लोक करत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय उपकरणांची गरज आणि मागणी आधीपेक्षा खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत ज्यांना शक्य आहे अशा लोकांनी आपल्या घरातच मिनी हॉस्पिटल बनवण्याची तयारी चालवली आहे. लोक दुप्पट पैसे देऊन ही उपकरणे आणि इतर सामान विकत घेत आहेत.

रोज किती खर्च येतो


घरातच एक आयसीयू सेटअप तयार करण्यासाठी व्हेंटिलेटरपासून अनेक वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता असते. वेगवेगळ्या कंपन्यांच्या उपकरणांची किंमत वेगवेगळी असते. त्यानुसार या सेटअपचा खर्च येतो. सरासरी एक नॉन - इनव्हेसिव्ह व्हेंटिलेटरची किंमत जवळपास ५०,००० रुपयांपासून ते २.५ लाख रुपये इतकी असते. जर कोणी घरातच आयसीयू चालवले तर या सेटअपला सुरू ठेवण्याचा रोजचा खर्च १५,००० रुपये ते २५,००० रुपये इतका येतो.

हेल्थ केअर अॅट होम सर्व्हिसेसची वाढली मागणी


कोरोनाच्या संकटात हेल्थकेअर अॅट होम (HealthCare at Home)सर्व्हिसेसची मागणी जवळपास २० पटींनी वाढवली आहे. वेगवेगळ्या कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक मागणी दिल्ली-एनसीआरच्या परिसरात आहे. या परिसरातील लोक वाटेल त्या किंमतीत घरीच आयसीयूचा सेटअप सुरू करू इच्छितात. आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ते हा सेटअप लावू इच्छितात. घरातच आयसीयू तयार करण्यासाठी काही लोक व्हेंटिलेटर (Ventilator), ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर (Oxygen Concentrator),ऑक्सिमीटर, कोरोनाच्या आजारात लागणारी औषधे इत्यादींचा मोठा साठा घरात करून ठेवत आहेत.

तज्ज्ञांची घेत आहेत सेवा


घरीच योग्य ईलाज करण्यासाठी आणि वैद्यकीय उपकरणे योग्य पद्धतीने चालवता यावीत यासाठी हे लोक वैद्यकीय क्षेत्रताील तज्ज्ञांची (Medical Professionals)घरातील आयसीयू सेटअप चालवण्यासाठी सेवा घेत आहेत. तर काही लोक आपात्कालीन परिस्थितीसाठी अॅडव्हान्स पैसे देऊन मेडिकल प्रोफेशनच्या सेवेचे बुकिंग करून ठेवत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने यावर्षी देशासमोर अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे. देशभर कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने मोठ्या प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशातील अनेक राज्यांनी लॉकडाऊनदेखील लागू केले आहे. अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये बेडचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत तर त्यांच्या कुटुंबियांना मोठी धावपळ करावी लागते आहे. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी