कोरोना लसीकरण : व्हॉट्सअॅपवर काही सेकंदात येईल लसीकरण प्रमाणपत्र, फक्त एका क्रमांकावर पाठवावा लागेल मॅसेज

देश-विदेशातील प्रवाशांना अनेक देशात प्रवेश देण्यापूर्वी लसीकरण प्रमाणपत्र मागितले जात आहे.

Vaccination Certificate will come on WhatsApp in a few seconds
व्हॉट्सअॅपवर काही सेकंदात येईल लसीकरण प्रमाणपत्र  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोविन पोर्टल किंवा अॅपवरून लस प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत.
  • प्रमाणपत्रासाठी +91 9013151515 हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा.
  • लसीकरणाच्या वेळी जो मोबाईल क्रमांक नोंदवला असेल त्यावर येणार ओटीपी

नवी दिल्ली : देश-विदेशातील प्रवाशांना अनेक देशात प्रवेश देण्यापूर्वी लसीकरण प्रमाणपत्र मागितले जात आहे. विशेष म्हणजे भारतातील अनेक राज्यांनीही याला सहमती दर्शवली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने लस प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. नागरिकांना व्हॉट्सअॅपवर लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळणार आहे. याविषयीची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांनी दिली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांनी शनिवारी सांगितले की, कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र आता काही सेकंदात आपल्याला व्हॉट्सअॅपद्वारे मिळू शकेल. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कोविन पोर्टल किंवा अॅपवरून लस प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांना यामुळे खूप मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, ज्या व्यक्तीला लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळवायचे आहे, त्याने त्याच्या मोबाईलवरून व्हॉट्सअॅप क्रमांकावर एक मॅसेज पाठवायचा आहे. यानंतर काही सेकंदात आपल्या व्हॉट्सअॅपवर हे प्रमाणपत्र पाठवले जाईल. आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी या हा निर्णय सर्वसामान्यासाठी उत्तम असल्याचे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

नोंदणीकृत क्रमांकावर येईल ओटीपी

प्रमाणपत्र मिळवण्यासाठी +91 9013151515 हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. यानंतर, covid certificate लिहून या क्रमांकावर संदेश पाठवावा लागेल. ज्या क्रमांकावरून लसीकरणासाठी नोंदणी केली जाईल त्यावर OTP येईल. त्याला व्हॉट्सअॅपच्या मेसेज बॉक्समध्ये लिहून परत पाठवायचे आहे. यानंतर, काही सेकंदात आपल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर लसीचे प्रमाणपत्र प्राप्त होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी