कोरोना लस घ्या आणि सोन्याचे बक्षीस मिळवा

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 06, 2021 | 17:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rajkot vaccination: रिपोर्टनुसार, कम्युनिटीने गिफ्ट महिलांना गिफ्ट म्हणून गोल्ड नोज पिन आणि पुरुषांना हँड ब्लेंडर गिफ्ट दिले जात आहे. 

corona vaccine
कोरोना लस घ्या आणि सोन्याचे बक्षीस मिळवा 

थोडं पण कामाचं

  • कोरोना लसीबाबत जागरूकता वाढवण्यासाठी मेहसाणा येथे पहिल्यांदा असे काही करण्यात आले
  • गुजरातच्या राजकोटध्ये गोल्डस्मिथ कम्युनिटी लस घेणाऱ्या लोकांना गिफ्ट देत हे.
  • राज्यात कोरोनाचे रुग्ण २७ मार्चपासून सातत्याने वाढत आहेत.

मुंबई: देशभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाईट कर्फ्यूसह कोरोना गाईडलाईन्सचे पालन विविध राज्ये आपापल्या स्तरावर करत आहेत. कोरोना लसीकरणही वेगाने सुरू आहे. मात्र यानंतरही कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढतच चालले आहेत. यातच एक अशी बातमी पुढे येत आहे की कोरोना लसीकरण केल्यास सोने आणि दुसरे आणखी गिफ्ट दिले जात आहेत. गुजरातच्या राजकोट येथे लस घेतल्यास सोने मिळत आहे. 

गुजरातच्या राजकोटध्ये गोल्डस्मिथ कम्युनिटी लस घेणाऱ्या लोकांना गिफ्ट देत हे. जास्तीत जास्त लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. रिपोर्टनुसार, कम्युनिटी गिफ्ट म्हणून महिलांना गोल्ड नोज पिन आणि पुरुषांना हँड ब्लेंडर देत आहे. हे गिफ्ट फक्त त्या लोकांना दिले जात आहे जे कम्युनिटीच्या शिबीरामध्ये लस घेत आहेत. 

कोरोना लसीबाबत जागरूकता वाढवण्यासाठी मेहसाणा येथे पहिल्यांदा असे काही करण्यात आले. मेहसाणामध्ये कोरोना लस घेणाऱ्यांना आकर्षक गिफ्ट देऊन सन्मानित केले जात आहे. मेहसाणा कार वर्कशॉपमध्ये कोरोना वॅक्सीन सर्टिफिकेट घेतल्याने सामान्य सेवेत कोणतेही लेबर चार्ज द्यावे लागत नाही. तसेच कार अॅक्सेसरीजवर १० टक्के सूट मिळते. याचा उद्देश केवळ कोरोना लसीबाबत जागरूकता पसरवणे होय.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा दिवसेंदिवस आकडा वाढत चालला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण २७ मार्चपासून सातत्याने वाढत आहेत. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चेनचे आदेश देण्यात आले आहेत. या अंतर्गत अनेक नियम लागू करण्यात आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता केवळ काही सेवा सुरू ठेवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. तर वीकेंडला कडक लॉकडाऊन केला जाणार आहे. 

27 मार्चला 2,276, 28 मार्चला 2,270, 29 मार्चला 2,252, 30 मार्चला 2,220, 31 मार्चला 2,360 आणि 1 एप्रिलला 2,640 वर 2410, 2 एप्रिलला आणि  2,815 एप्रिल ३ ला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी