२०२० वर्षाअखेरीस कोरोनावरील प्रभावी लस बाजारात येऊ शकते, आत्तापर्यंत ४ कोटी डोस तयार

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 24, 2020 | 12:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोरोना साथीला ७० टक्क्यांपर्यत रोखण्यात प्रभावी असलेल्या अ‍ॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्ड कोविड -१९ या लसीच्या आणीबाणी मंजुरीचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. 

Corona vaccine
कोरोनोवरील लस  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांबाबतची एक दिलासादायक बातमी म्हणजे या वर्षाच्या अखेरीस देशात कोरोना विषाणूची पहिली लस येऊ शकते
  • पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या लसीच्या तातडीच्या मंजुरीच्या तयारीत व्यस्त आहे आणि जर सर्व काही ठीक झाले तर या वर्षाच्या अखेरीस त्यास मान्यता देण्यात येईल.
  • कोरोना लसीच्या सकारात्मक परिणामांमुळे भारतात ही लस वेगाने बाजारात येण्याची आशा निर्माण झाली आहे

नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांबाबतची एक दिलासादायक बातमी म्हणजे या वर्षाच्या अखेरीस देशात कोरोना विषाणूची पहिली लस येऊ शकते. कोरोना साथीला ७० टक्क्यांपर्यत रोखण्यात प्रभावी असलेल्या अ‍ॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्ड कोविड -१९ या लसीच्या आणीबाणी मंजुरीचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या लसीच्या तातडीच्या मंजुरीच्या तयारीत व्यस्त आहे आणि जर सर्व काही ठीक झाले तर या वर्षाच्या अखेरीस त्यास मान्यता देण्यात येईल.

जानेवारीपर्यंत १० कोटी डोस

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला म्हणाले की, 'आम्ही तातडीच्या परवान्यासाठी लवकरच अर्ज करू आणि आशा आहे की महिन्याभरात तो आम्हाला मिळेल. अंतिम मंजुरी डीसीजीआयच्या निर्णयावर अवलंबून असते.' त्यांनी सांगितले की कंपनीने आतापर्यंत सुमारे ४ कोटी डोस तयार केले आहेत आणि जानेवारीपर्यंत सुमारे १० कोटी डोस तयार होतील.

अपेक्षा वाढल्या

कोरोना लसीच्या सकारात्मक परिणामांमुळे भारतात ही लस वेगाने बाजारात येण्याची आशा निर्माण झाली आहे. खरं तर, अ‍ॅस्ट्रॅजेनेकाचे निकाल कोविड -१९ लसींकरीता भारतीय औषध नियामक (डीसीजीआय) यांनी तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना किंवा मसुद्याची पूर्तता करतात आणि जर ही लस ५० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले तर त्यास मान्यता दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसची अपेक्षा वाढली आहे जी ७० टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे.

इतकी असेल लसीची किंमत 

ते म्हणाले की कोविशिल्डच्या एका डोसची किंमत बाजारात  ५००-६०० रुपये असेल आणि सरकारला २२०-३०० रुपये (३-४ डॉलर) खर्च येईल. लसचे दोन डोस आवश्यक असतील. त्या तुलनेत फायझर आणि मॉडर्ना यांचे दर खूपच जास्त आहेत. मॉडर्ना लसची किंमत ३७ डॉलर  असू शकते, म्हणजेच प्रति डोस २,७७५ रुपये, तर फायझर लसची किंमत २० डॉलर म्हणजेच १५०० रुपये असू शकते. 
पूनावाला म्हणाले, 'कोविशील्ड ही कोविड-१९ वरील लस कमी खर्चात, तार्किकदृष्ट्या व्यवस्थापित व लवकरच उपलब्ध होईल, याचा मला आनंद आहे. या लसीचा एक डोस आपल्याला ९०% सुरक्षित बनवतो, दुसरा डोस आपल्याला ६२ वर्षापर्यंत सुरक्षा देतो.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी