कोरोनाची लस अखेर बाजारात येण्यासाठी सज्ज, काय असणार सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीची किंमत?

कोरोनाच्या जागतिक संकटाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. लाखो लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला असून कोट्यावधी लोक संसर्गबाधित आहेत. त्यामुळे या विषाणूवरच्या लसीकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.

Corona virus vaccine
कोरोनाची लस अखेर बाजारात येण्यासाठी सज्ज, काय असणार सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीची किंमत? 

थोडं पण कामाचं

  • कधीपर्यंत उपलब्ध होणार कोव्हिशील्ड लस?
  • काय असेल किंमत आणि वितरणासाठी किती कालावधी लागणार?
  • कोरोना लसीच्या वितरणाची तयारी चालू

मुंबई: कोरोनाच्या (Corona) घातक विषाणूवर (dangerous virus) नियंत्रण (control) मिळवण्यासाठी जगभरात (global scale) अनेक लसींच्या चाचण्या (vaccines in trials) विविध टप्प्यांवर चालू (various stages) आहेत. याकडे सर्वांचेच डोळे लागलेले (eyes on corona vaccine) आहेत. आता याच दिशेने काम करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) याबाबतची एक चांगली बातमी (good news) दिली आहे. या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) अदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी सांगितले आहे येत्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीतच (first semester of next year) ही लस उपलब्ध (vaccine available) होणार आहे.

कधीपर्यंत उपलब्ध होणार कोव्हिशील्ड लस?

सिरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला यांनी शुक्रवारी सांगितले की फेब्रुवारी २०२१पर्यंत कोरोना विषाणूवरची कोव्हिशील्ड ही लस आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्यासाठी उपलब्ध होणार आहे. तर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही लस एप्रिल २०२१पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

काय असेल किंमत आणि वितरणासाठी किती कालावधी लागणार?

कोरोनाची लस सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध झाल्यानंतर या लसीचे २ डोस प्रत्येकाला देण्यात येतील. या दोन डोसची किंमत १,००० रुपये असणार आहे. या लसीच्या आत्तापर्यंत करण्यात आलेल्या सर्व चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक आले असून आता शेवटच्या टप्प्यातील चाचण्यांच्या निकालाची प्रतीक्षा केली जात आहे. येत्या चार वर्षांमध्ये म्हणजे साधारण २०२४पर्यंत भारतभरातील सर्व नागरिकांना ही लस देण्यात येईल. अदर पूनावाला यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की प्रत्येक नागरिकाला ही लस देण्यासाठी साधारण २-३ वर्षे लागू शकतात.

कोरोना लसीच्या वितरणाची तयारी चालू

कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर या लसीच्या साठवणुकीसाठीची तयारी एव्हाना चालू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार अनेक राज्य सरकारांच्या मदतीने कोल्ट स्टोरेजची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी फिरते रेफ्रिजिरेटर, कूलर, मोठे रेफ्रिजिरेटर यासोबतच १५० डीप फ्रीजर्सही तयार ठेवण्यात आले आहेत. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात या रेफ्रिजिरेटर्सची निर्मितीही केला जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी