Corona vaccine: आज दुपारी ४ वाजेपासून वयाने 18 +असलेले करू शकतील नोंदणी; जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया

कोरोनाने देशात हाहाकार माजवला असून वाढती रुग्ण संख्या पाहता सरकारने १८ वर्षावरील व्यक्तींना लस घेण्याची परवानगी दिली आहे. देशात गेल्या २४ तासात सर्वाधिक रुग्ण वाढ झाली आहे, शिवाय मृतांचा आकडाही वाढला आहे.

Those aged 18+ can register from 4 pm today
आज दुपारी ४ वाजेपासून वयाने 18 + असलेले करू शकतील नोंदणी  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • दुपारपासून नोंदणीला सुरुवात
  • मोबाईल किंवा अॅपवर कशी कराल नोंदणी
  • तीन जणांची करता येईल नोंदणी

नवी दिल्ली :  कोरोनाने(Corona) देशात हाहाकार माजवला असून वाढती रुग्ण संख्या पाहता सरकारने १८ वर्षावरील व्यक्तींना लस घेण्याची परवानगी दिली आहे. देशात गेल्या २४ तासात सर्वाधिक रुग्ण वाढ झाली आहे, शिवाय मृतांचा आकडाही वाढला आहे. या २४ तासात ३ हजार २९३ जणांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत तरुण अधिक कोरोनाग्रस्त होत आहेत. यामुळे सरकारने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण करण्याच ठरवले आहे. लसीकरणाचा (Vaccination) टप्पा जलद गतीने पुर्ण करण्याचा मानस सरकारी यंत्रणेचा असणार आहे. दरम्यान लसीसाठी आज दुपार ४ वाजेपासून नोंदणी केली जाणार आहे. ही नोंदणी कशाप्रकारे केली जावी याची माहिती या लेखातून आपण घेणार आहोत.. कोरोना लस कशी बुक करावी? मोबाईल किंवा अॅपवर कशी नोंदणी करावी? जाणून घ्या तुम्हाला आवश्यक असणारी सर्व माहिती आपण यात पाहणार आहोत. 

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील लोकांना लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी सरकारच्या को-डब्ल्यूआयएन पोर्टलवर ( Co-WIN) आणि cowin.gov.in तसेच (Aarogya Setu App) पर नोंदणी करु शकता. बुधवारी सायंकाळी ४ वाजता सुरू होणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक असेल. नोंदणीसाठी आधार क्रमांक (किंवा तत्सम ओळखपत्र), मोबाईल क्रमांक लागणार आहे.

याप्रकारे असेल  नोंदणीची प्रक्रिया ?

१) कोविन प्लॅटफॉर्मवर (CoWIN) आणि आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोंदणी सुरू होईल.

२)कोविन पोर्टलवर जा (www.cowin.gov.in) त्याठिकाणी तुम्ही ओटीपीसाठी आपला मोबाईल नंबर द्यावा लागले.

३) नोंदणीचा अर्ज समोर दिसेल. त्यात नाव, जन्मवर्ष, आधार क्रमांक आदी माहिती भरा.

४) लसीकरणासाठी आपल्या जवळचे केंद्र किंवा आपणास हवे असेल ते केंद्र (पिनकोड किंवा जिल्ह्याचे नाव टाकून) निवडा.

लसीकरणाची नोंदणी

४) आपल्या एका क्रमांकावर स्वत:सह चार जणांची नोंदणी करू शकतो.

५) नोंदणी पुर्ण झाल्यावर तुमच्या मोबाईल क्रमांकावर संदेश येतो.

६) सर्व डिटेल्स तपासून घ्या. त्यांनतर तुम्हाला Beneficiary Reference ID मिळेल.
७) तुमचे लसीकरण केंद्र निश्चित करण्यासाठी डिटेल्स भरा. त्यानंतर कॅलेंडर आयकॉनवर जाऊन शेड्युल अपॉईंटमेंट बटनवर क्लिक करून लसीकरण केंद्र निवडा. 
८) स्लॉट निवडून बुक बटणवर क्लिक करा. सर्व डिटेल्स चेक करून कन्फर्म बटनवर क्लिक करा.

लसीकरणाची नोंदणी

आरोग्य सेतु अ‍ॅपवर अशी करा नोंदणी

आरोग्य सेतु अ‍ॅपवर तुम्हाला कोविन डॅशबोर्ड देखील दिसेल. तिथे क्लिक केल्यानंतर लॉगिन / रजिस्टरवर टॅप करावे लागेल. मग आपल्याला आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल. ज्यावर ओटीपी येईल, त्यात प्रवेश करून तुमचा मोबाईल नंबर पडताळला जाईल. यानंतर, तुम्हाला आधार कार्ड, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स यासारख्या फोटो आयडी कार्डांपैकी एक पर्याय निवडावा लागेल. नाव, जन्मतारीख यासारखी माहिती द्यावी लागेल.

असे डाउनलोड करा लस सर्टिफिकेट 

अ‍ॅपवर Vaccination Certificate पर्यायावर जा.
 आपला Beneficiary Reference ID टाकून Get Certificate बटनवर क्लिक करा आणि सर्टिफीकेट मिळवा.
  तुम्ही या अकाउंट वरून आणखी तीन लोकांची रजिस्ट्रेशन करू शकता.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी