LIVE Updates: उद्धव ठाकरे संतापले, विकृतांना दिला इशारा

LIVE UPDATE 4th Apr 2020: देशासह राज्यातील सर्व अपडेट आता आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. त्यामुळे सर्व माहिती आपल्याला एकाच ठिकाणी मिळणार आहे.

Corona Virus And Lockdown Update
दिवसभरातील सर्व अपडेट एकाच ठिकाणी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • दिवसभरातील सर्व अपडेट एकाच ठिकाणी
 • राज्यासह देशातील विविध घडामोडी
 • प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर

मुंबई:  कोरोना व्हायरसचे महाराष्ट्रात 490 रुग्ण झाले आहेत. गेल्या 24 तासांत 67 नवे रुग्ण सापडले. त्यातले सर्वाधिक मुंबईत सापडले. त्यानंतर पुण्यात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली आहे. भारतामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाची 601 नवी प्रकरणं समोर आली आहेत. यानंतर आता देशात रुग्णांचा आकडा हा 2902वर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांचा हा वाढता आकडा खऱंतर नागरिकांची चिंता वाढवणारा आहे. राज्यासंह संपूर्ण देशातील दिवसभरातील महत्त्वाचे असे नेमके अपडेट आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. देशाच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घटना आपल्याला इथे पाहता येणार आहेत. पाहा आजच्या दिवसातील राज्यासह देशभरातील घडामोडी.

पाहा LIVE UPDATE

 1. नोटांना थुंकी लावण्याचा व्हिडीओ किंवा इतर त्यासारखे व्हिडीओ पसरवले जात आहेत. ज्यामुळे दोन समजांमध्ये तेढ निर्माण होते. असं गंमत म्हणूनही कुणी करत असेल तरीही त्यांच्यावर कारवाई होणारच असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. 
 2. या लढाईत डॉक्टर, नर्सेससोबत काही विकृती गैरवर्तन करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा विकृतींची गय केली जाणार नसल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी आज दिला.
 3. समाजात काही विकृत व्हायरस आहेत. समाजात दुही माजवणाऱ्यांना माझ्या कायद्याच्या कचाट्यातून कुणीही वाचवू शकणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 
 4. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 537 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा ही चिंताजनक बाब आहे. राज्यामध्ये रात्रभरात 47 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.
 5.  व्हॉट्सअॅप वर कोणीही काहीही औषध सांगतायेत ... डॉक्टर मेहनत घेऊन काम करतायेत, डॉक्टर, महावितरण, शेतकरी, सरकार, पोलीस यांचे आभार- राज ठाकरे
 6. मोठे आर्थिक संकट येणार शिस्त पाळले नाही तर,  जे शिस्त पाळत नाही त्यांच्यामुळे इतरांवर ही परिस्थिती येते- राज ठाकरे
 7. मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय उपाचर बंद करायला हवे. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना  फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. लॉकडाऊन आता आहे, नंतर आम्ही आहोतच, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
 8. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
 9. सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं ३० एप्रिल पर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची तिकिट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाकडून याबाबत माहिती देण्यात आली. सध्या देशात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील काय निर्णय होईल याकडे आमचं लक्ष आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली.
 10. अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी, अमरावती शहरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णाचा 2 एप्रिलला मृत्यू झाला असून आज सकाळी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
 11. भारतावर तबलिघी जमातमुळे कोरोना संक्रमणाचं मोठं संकट, कोरोनाचा सामना करण्यासाठी खासदार निधीतून पंतप्रधान निधीमध्ये 365 कोटी जमा, कोरोना संकट साठी खासदार निधीतून पंतप्रधान निधीमध्ये 365 कोटी जमा, कोरोना संकट वर मात करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने 11,092 कोटी रुपयांची सर्व राज्यांना मदत, एसडीएमआरफ अंतर्गत निधी, 15 एप्रिल पासून काहीच रेल्वे गाड्या सुरु होणार
 12. देशात कोरोनाबाधितांचा आकडा 3000 पार, जगात कोरोना मुळे 55 हजार मृत्यू
 13. महानगरपालिका बृहन्मुंबई मुंबईत कोविड १ patients रूग्णांच्या प्रवेश आणि उपचारासाठी मानक कार्यप्रणाली जारी करते.
 14. नागपूर : मकरजहून आलेल्या 33 जणांचे नमुने निगेटीव्ह, इतर तब्लिगींचे रिपोर्ट आज सायंकाळपर्यंत येणार, मरकजशी संबंधित 180 जणांना नागपूरात क्वारंटाईन करण्यात आलं, मरकजशी संबंधित इतरांचा मनपाकडून युद्ध पातळीवर शोध सुरु
 15. शनिवारी जारी केलेल्या अहवालानुसार, मागच्या 24 तासांमध्ये देशात 601 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. आतापर्यंत भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2902 पर्यंत वाढली आहे. त्यामध्ये 2650 सक्रिय प्रकरणं तर 183 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मृतांची संख्या 68 वर पोहोचली आहे. अशी अधिकृत माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी