Coronavirus Prevention : कोविड विषाणू (covid virus)संसर्ग ( infection) अजूनही सुरू आहे. कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटचा प्रसार इतर विषाणूंच्या तुलनेत खूप जास्त होत आहे. दररोज सुमारे 1500 नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकार आणि आरोग्य प्रशासन (Health Administration) चिंतेत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने खबरदारी घेण्याचं आवाहन केले आहे. (Corona virus : Follow the four T's for prevention, as suggested by the Ministry of Health)
अधिक वाचा : हे शाकाहारी पदार्थ केसांना बनवतात मजबूत
XBB 1.16 व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नाहीत. लक्षणं नसणं हे डॉक्टरांसाठी चिंताजनक आहे. लक्षण दिसत नसल्यामुळे असे कोरोनाबाधित रुग्ण इतर लोकांना जास्त संक्रमित करू शकतात. यामुळे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागली आहेत.
अधिक वाचा : मुंबई इंडियन्सने ट्रॉफी जिंकली, फायनलमध्ये दिल्लीचा पराभव
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात 25 मार्च रोजी 1590 प्रकरणांची नोंद झाली आहे. गेल्या 146 दिवसांतील ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. गेल्या पाच आठवड्यात देशातील कोरोना संसर्गाची संख्या 9 पटीने वाढली आहे. डॉक्टरांच्या मते, सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रसार हा XBB 1.16 व्हेरियंटमुळे आहे.
अधिक वाचा : सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर बनली निखत झरीन
कोरोनाच्या इतर व्हेरियंटपेक्षा XBB 1.16 चा प्रसार वेगाने होतो. हा व्हेरियंट इतर प्रकारांच्या तुलनेत रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देण्यास सक्षम आहे. ही बाब लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाने राज्यांना कोविडचा सामना करण्यासाठी चार T म्हणजेच टेस्ट-ट्रॅक-ट्रीट- टीकाकरण (लसीकरण) करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पाच दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. बॅक्टेरियल एन्फेक्शन (Bacterial Infection) म्हणजेच व्हायरल फ्लू झाल्याची शंका असल्यास अँटीबायोटीकचा वापर करू नये. मास्कचा वापर करा, सुरक्षित सामाजिक अंतर राखा, शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन लेव्हलचे निरीक्षण करा, अशा सुचना आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत.