Dragon Fruit Corona : ड्रॅगन फ्रुटमध्ये आढळला कोरोना विषाणू, चीनमध्ये अनेक बाजार केले बंद

Dragon Fruit Corona चीनमध्ये ड्रॅगन फ्रुटमध्ये कोरोनाचा विषाणू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ड्रॅगन फ्रुटमध्ये कोरोना आढळल्याने संपूर्ण बाजार बंद करण्यात आला आहे.

dragon fruit corona
ड्रॅगन फ्रुटमध्ये कोरोना  
थोडं पण कामाचं
  • चीनमध्ये ड्रॅगन फ्रुटमध्ये कोरोनाचा विषाणू आढळल्याने एकच खळबळ
  • ड्रॅगन फ्रुटमध्ये कोरोना आढळल्याने संपूर्ण बाजार बंद
  • परदेशातून आलेल्या प्रत्येक खाण्या पिण्याच्या वस्तूची तपासणी

Dragon Fruit Corona : बीजींग : जगभरात अजूनही कोरोनाचे संकट (corona pandemic) कमी होताना दिसत नाहिये. देशात आणि संपूर्ण जगात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जग कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या (corona third wave) उंबरठ्यावर आहे की काय असे चित्र आहे. त्यात ओमिक्रॉनचे (omicron) आणखी डोकेदुखी वाढवली आहे. यापूर्वी खाण्या पिण्याच्या वस्तूंमध्ये कोरोनाचा विषाणू (corona virus) आढळला नव्हता. आता चीनमध्ये ड्रॅगन फ्रुटमध्ये (dragon fruit) कोरोनाचा विषाणू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ड्रॅगन फ्रुटमध्ये कोरोना आढळल्याने संपूर्ण बाजार बंद करण्यात आला आहे. ही फळं व्हिएतनाममधून (vietnam) चीनमध्ये आणण्यात आली होती. (corona virus found in dragon fruit china imports from Vietnam)

मिळालेल्या माहितीनुसार चीनच्या झेजियांग आणि जियांग्शी प्रांतातील नऊ शहरांमध्ये फळांमध्ये कोरोना विषाणू आढळला आहे. त्यानंतर ज्यांनी ही फळं विकत घेतली आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच परदेशातून आलेल्या प्रत्येक खाण्या पिण्याच्या वस्तूची तपासणी केली जात आहे. 


ड्रॅगन फ्रुटच्या आयातीवर बंदी
 

ड्रॅगन फ्रुटमध्ये कोरोना विषाणू आढळल्याने व्हिएतनामधून आयात करण्यात येणार्‍या ड्रॅगन फ्रुटवर २६ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. चीनमध्ये गेल्या आठवड्यात ड्रॅगन फ्रुटमध्ये कोरोना विषाणू आढळला होता. चीनच्या शी’आन शहजार कोरोनाच कहर झाल्याने लॉकडाऊन लावण्यात आला होता. नंतर युझू शहरातही प्रादुर्भाव वाढल्याने तिथेही लॉकडाऊन लावण्यात आला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी