चिंता वाढवणारी बातमी..!, मंकीपॉक्सनं वाढवली डोकेदुखी; 'या' राज्यात आढळला दुसरा रूग्ण

देशात एकीकडे कोरोनाचा (Corona) प्रार्दुभाव वाढ चालला आहे. दिवसेंदिवस पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यातच आता मंकीपॉक्सनं (Monkeypox) देशात शिरकाव केला आहे.

monkeypox
मंकीपॉक्स रूग्ण 
थोडं पण कामाचं
  • देशात एकीकडे कोरोनाचा (Corona) प्रार्दुभाव वाढ चालला आहे.
  • आता मंकीपॉक्सनं (Monkeypox) देशात शिरकाव केला आहे.
  • देशात आता मंकीपॉक्सचे दोन रूग्ण आढळून आले आहेत.

तिरुवनंतपुरम: एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशात एकीकडे कोरोनाचा (Corona) प्रार्दुभाव वाढ चालला आहे. दिवसेंदिवस पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यातच आता मंकीपॉक्सनं (Monkeypox) देशात शिरकाव केला आहे. देशात आता मंकीपॉक्सचे दोन रूग्ण आढळून आले आहेत. केरळमधील (Kerala)  कन्नूर (Kannur)  येथील एका 31 वर्षीय व्यक्तीची सोमवारी मंकीपॉक्सची (Monkeypox) चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. भारतात या आजाराची ही दुसरी घटना आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Health Ministry) अधिकाऱ्यानं यासंदर्भातली माहिती दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटीव्ह आढळलेला हा रूग्ण 13 जुलै रोजी दुबईहून कर्नाटकातील मंगळुरू विमानतळावर उतरला होता. मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याचे नमुने पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठवण्यात आले. अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यानं पुढे सांगितलं की, तपासणीदरम्यान त्या व्यक्तीला व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आलं. 

अधिक वाचा-   मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा असा असेल आजचा दिल्ली दौरा, खासदारांबाबत केलं महत्त्वाचं वक्तव्य

गुरुवारी कोल्लम जिल्ह्यात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या आठवड्यात राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना करण्यास मदत करण्यासाठी केरळला एक उच्चाधिकारी पथक पाठवलं.

दरम्यान, तिरुअनंतपुरममधून मिळालेल्या वृत्तानुसार, केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात दुबईहून राज्यात आलेल्या एका 31 वर्षीय व्यक्तीची मंकीपॉक्सची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राज्यातील तसंच देशातील मंकीपॉक्सची ही दुसरी घटना आहे.

पुढे वीणा जॉर्ज म्हणाल्या की, 13 जुलै रोजी केरळला पोहोचलेला रुग्ण कन्नूरचा रहिवासी आहे आणि तिथल्या परियाराम मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. रूग्णाच्या संपर्कात असलेल्या सर्वांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे कांजिण्या (कांजण्या) या आजारासारखी पण सौम्य स्वरुपाची असतात. मंकीपॉक्स झाल्यावर त्वचेवर लालसर रंगाचे फोड येतात. हे फोड आल्यावर खाजवले तर फोड फुटून त्यातून बाहेर पडणारा द्राव संसर्ग पसरवू शकतो. यामुळे मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीला वैद्यकीय सल्ल्याने स्वतंत्र खोलीत राहून उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मंकीपॉक्स हा दोन ते चार आठवड्यात बरा होणारा आजार आहे. पण सध्या या आजारावर ठोस उपचार पद्धती अस्तित्वात आलेली नाही. अनेक डॉक्टर कांजिण्या (कांजण्या) या आजारावर करतात तशा स्वरुपाचे उपचार करून आणि विशिष्ट औषधे लागू पडली नाही तर रुग्णाच्या तब्येतीचा अंदाज घेऊन अनुभवाने औषधे बदलून उपचार करत आहेत. यामुळे सध्या मंकीपॉक्सचा मृत्यूदर ३-६ टक्के आहे. 

अधिक वाचा- 'हे तर वासू-सपनाचं सरकार, अजून आपलं...', संजय राऊतांची अत्यंत बोचरी टीका

मंकीपॉक्स हा आजार १९५८ मध्ये पहिल्यांदा माकडांमध्ये आढळला आणि १९७० मध्ये तो माणसाला झाल्याचे पहिले उदाहरण सापडले. हा आजार प्रामुख्याने आफ्रिका खंडातील मध्य आणि पश्चिम भागातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. इतर देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण अधूनमधूनच आढळले आहेत. 

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्स झाल्यास ताप येणे, त्वचा लालसर दिसणे, त्वचेवर लालसर रंगाचे फोड येणे, अंगदुखी अशा स्वरुपाची लक्षणे आढळतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी