ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण, रिपोर्ट पॉझिटिव्ह 

ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ब्रिटनच्या राजघराण्यात एकच गोंधळ उडाला आहे. 

corona's case in british royalty too prince charles's test positive covid 19 uk
ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण, रिपोर्ट पॉझिटिव्ह   |  फोटो सौजन्य: AP, File Image

लंडन: जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता ब्रिटनमधील राजघराण्यापर्यंत हा आजार जाऊन पोहचला आहे. मीडिया रिपोर्टनुसार,  प्रिन्स चार्ल्स यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.  ७१ वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांना सुरुवातीला कोरोनाची काही लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर व चांगली असल्याचं सांगण्यात येत आहे.

डचेस ऑफ कॉर्नवॉल, म्हणजेच प्रिन्स चार्ल्स यांची पत्नी कॅमिला यांचीही कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली. परंतु त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. प्रिन्स चार्ल्सच्या कोरोना व्हायरस टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना स्वतंत्र ठेवण्यात आलं आहे. तर कॅमिला यांना देखील आयसोलेटड करण्यात आलं आहे. प्रिन्स चार्ल्स हे गेल्या काही दिवसांपासून घरातूनच काम करत होते.

यासंदर्भात अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, प्रिन्स चार्ल्स आणि डचेस ऑफ कॉर्नवाल यांची डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, दोघेही सध्या स्कॉटलंडमधील त्यांच्या घरी सेल्‍फ-आइसोलेशनमध्ये आहेत. दरम्यान, या निवेदनात असंही म्हटलं आहे की, प्रिन्स चार्ल्स यांना या आजाराचं संक्रमण कुठून झालं हे सांगणे कठीण आहे.  कारण की, गेल्या काही आठवड्यांमध्ये ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.

प्रिन्स चार्ल्स आणि राजघराण्याविषयी थोडक्यात माहिती: 

प्रिन्स चार्ल्स हे प्रिन्सेस एलिझाबेथ आणि एडिनबर्गचे ड्यूक फिलिप यांचे पहिले पुत्र आहेत. किंग जॉर्ज सहावा आणि राणी एलिझाबेथ यांचे ते पहिले नातू आहेत. चार्ल्स  यांचे पणजोबा किंग जॉर्ज पाचवे यांच्या संरचनेवर आधारित 
ब्रिटीश राजपुत्र किंवा राजकुमारीची पदवी आणि रॉयल उच्चता शैली केवळ शाही पुरुष मुले आणि नातवंडे यांनाच दिली जावी. तसेच वेल्सच्या राजपुत्रांच्या थोरल्या मुलाला दिली जावी. 

दरम्यान, २२ ऑक्टोबर, १९४८ मध्ये जॉर्ज पाचवे यांनी एक पत्रक जारी केलं होतं. ज्यामध्ये राजकुमारी एलिझाबेथ आणि राजकुमार फिलिप यांच्या कोणत्याही मुलासाठी हा सन्मान मान्य करण्यासाठी एक नवीन निवेदन दिले. अन्यथा, चार्ल्सने आपल्या वडिलाची पदवी संपादन केली आणि तेव्हापासून अर्ल ऑफ मेरिनेथच्या रुपात उपाधी दिली जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी