धक्कादायक, कोरोनापासून बरे झालेल्या १० टक्के रुग्णांना पुन्हा लागण 

कोरोना आजारापासून निरोगी झालेल्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

coronavirus china recovered 10 percent again  positive
धक्कादायक, कोरोनापासून बरे झालेल्या १० टक्के रुग्णांना पुन्हा लागण   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • गेल्या महिन्याभरात चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
  • चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही असा दावा चीनने केला आहे.
  • चीनमधील जवळजवळ ७८ हजार लोकं निरोगी झाली आहेत.

वुहान :  गेल्या महिन्याभरात चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच आता तर चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही असा दावा चीनने केला आहे. चीनमधील जवळजवळ ७८ हजार लोकं निरोगी झाली आहेत. केवळ ५ हजार लोकं सध्या उपचार घेत आहेत. मात्र चीनसमोर आता एक नवीन आव्हान उभं राहिलं आहे. कोरोना आजारापासून निरोगी झालेल्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दक्षिण चीन मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, वुहानमधील डॉक्टरांना कोरोनापासून निरोगी झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. पुन्हा कोरोनाची लागण होण्यामागील कारण मात्र अजूनही आरोग्य विभागातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांना सुद्धा समजू शकलेले नाही. मात्र कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान जी औषधं वापरली जातात, त्याचा परिणाम संपल्यानंतर पुन्हा शरिरात कोरोना विकसित होतो की काय अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. 

पीपल्स डेलीच्या हेल्थ जर्नल लाइफ टाईम्सनेही दावा केला आहे की वुहानमध्ये बरे झालेल्या कोरोना रूग्णांपैकी १०% रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. तसेच रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांपैकी ८% ते १०% रुग्णांना पुन्हा कोरोना संसर्ग होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे एकठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होत असल्यामुळे चीनसमोर आता नवीन संकट उभं राहिलं आहे.

दरम्यान, चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या कोरोनाने जगातील तब्बल १७५ देशांना विळखा घातला. जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४,७१,९४० वर पोहोचली असून, बळींची एकूण संख्या २१ हजार ५७७ इतकी झाली आहे. जगभरातील १८१ देशातील ही संख्या आहे. यामध्ये युरोपमधील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २,२६,३४० पेक्षा अधिक तर बळींची संख्या १२,७१९ इतकी आहे. भारतात कोरोनामुळे  ४ मृत्यू झाल्याने ही संख्या १३ वर गेली आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...